ब्लॅक मॅजिक! तेलंगणात उमेदवाराला पराभूत करण्यासाठी चक्क घुबडांची तस्करी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 03:28 PM2018-12-03T15:28:56+5:302018-12-03T15:30:05+5:30

तेलंगणाच्या सीमारेषेवरील सेदाम तालुक्यातून 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Black Magic! To defeat the candidates in Telangana, many owls smuggled by karnataka | ब्लॅक मॅजिक! तेलंगणात उमेदवाराला पराभूत करण्यासाठी चक्क घुबडांची तस्करी

ब्लॅक मॅजिक! तेलंगणात उमेदवाराला पराभूत करण्यासाठी चक्क घुबडांची तस्करी

हैदराबाद - तेलंगणामध्ये निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. 7 डिसेंबर रोजी तेलंगणात विधानसभेच्या 119 जागांसाठी मतदान घेण्यात येत आहे. त्यामुळे बड्या नेत्यांच्या सभांनी हैदराबादसह तेलंगणा दणाणून सोडले आहे. उमेदवारांकडून प्रचारासाठी कुठं चुली फुकल्या जात आहेत. तर, कुठे मतदारांची दाढी करण्यात येत आहे. मात्र, घुबडाचा वापर करुन ब्लॅक मॅजिक करण्याचाही प्रयत्न होत असल्याचे समोर आले आहे. तेलंगणातील कलबुर्गी जिल्ह्यात हा प्रकार उघडकीस आला.

तेलंगणाच्या सीमारेषेवरील सेदाम तालुक्यातून 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ईंडियन ईगल आऊल म्हणजेच घुबडाची तस्करी केल्याप्रकरणी यांना अटक करण्यात आली. त्यानंतर, पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक बाब समोर आली आहे. तेलंगणात सध्या निवडणुकांचा माहोल सुरू आहे. तेथील नेत्यांना रात्री जागरण करणाऱ्या पक्षांची गरज होती. काळा जादूचा वापर करुन आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला पराभूत करण्यासाठी त्यांनी आमच्याकडे घुबडांची मागणी केली होती. या घुबडांच्या सहाय्याने प्रतिस्पर्धी उमेदवारांचे गुडलक हे बॅडलकमध्ये बदलण्याची जादू करण्यात येणार असल्याचे या तस्करीखोर आरोपींनी सांगितले. 

विशेष म्हणजे इंग्लंड आणि इतर देशांमध्ये रात्री जगणाऱ्या पक्ष्यांना बुद्धीचे प्रतिक मानण्यात येते. तर भारतात त्याच पक्षांना वाईट किंवा कमनशिबी समजण्यात येते. आपल्याला एखादे घुबड दिसल्यास आपणही अंधश्रद्धेचे बळी पडतो. वन विभागातील सुत्रांच्या माहितीनुसार, या घुबडांची तेलंगणात विक्री करण्यात येणार होती. या एका घुबडाची किंमत 3 ते 4 लाख रुपये ठरविण्यात आली होती. या घुबडांचा वापर करुन लोकांना आपल्या ताब्यात ठेवण्यात येते. घुबडांचे डोळे मोठे मोठे असतात, त्यांच्या पापण्या कधीही उघडझाप करत नाहीत. त्यामुळे लोकांना आपल्या वशमध्ये ठेवता येते, असेही अनेकांचे म्हणणे आहे. 

कर्नाटक राज्यात काळ्या जादूसाठी घुबडांची मोठ्या प्रमाणात तस्करी करण्यात येते. क्विक अॅनिमल रेस्क्यू टीमचे संस्थापक मोहन यांच्यामते, मांत्रिकांकडून काळ्या जादूवेळी स्लेंडर लॉरिस आणि घुबडांचा वापर करण्यात येतो. मात्र, स्लेंडर लॉरिसला पकडणे कठीण असल्याने घुबडांना पकडून या काळ्या जादूचा वापर करण्यात येतो. तर गुप्त धनाच्या शोधासाठीही घुबडावर प्रयोग केले जातात. 
 

Web Title: Black Magic! To defeat the candidates in Telangana, many owls smuggled by karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.