काठावर असलेल्या ‘त्या’ ३० जागांवर भाजप- काँग्रेस देत आहे विशेष लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 08:23 AM2018-11-17T08:23:44+5:302018-11-17T08:24:46+5:30

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत २०१३ मध्ये भाजप आणि काँग्रेसला अवघ्या २५०० मतांच्या फरकाने ३० जागा

The BJP-Congress are giving special attention to the 'those' 30 seats that are on the edge | काठावर असलेल्या ‘त्या’ ३० जागांवर भाजप- काँग्रेस देत आहे विशेष लक्ष

काठावर असलेल्या ‘त्या’ ३० जागांवर भाजप- काँग्रेस देत आहे विशेष लक्ष

Next

गजानन चोपडे

जबलपूर : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत २०१३ मध्ये भाजप आणि काँग्रेसला अवघ्या २५०० मतांच्या फरकाने ३० जागा गमवाव्या लागल्या होत्या. यंदा त्यांनी याच ३0 जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. सागर जिल्ह्यातील सुरखी मतदारसंघात २०१३ साली भाजपच्या उमेदवार पारुल साहू यांनी काँग्रेसचा केवळ १४१ मतांनी विजय मिळवला होता. यंदा विजयाची कुठलीही संधी सोडायची नाही, अशी व्यूहरचना काँग्रेसने आखली आहे.

कटनी जिल्ह्यात विजयराघवगड येथून भाजपच्या पद्मा शुक्ला यांचा अवघ्या ९९२ मतांनी पराभव करणारे काँग्रेसचे संजय पाठक भाजपावासी होताच त्यांना मंत्रिपदाचे बक्षीस मिळाले होते. यंदाही तेच रिंगणात आहेत. राज्यातील सुमारे ३० जागांवर असेच निसटते विजय मिळाले होते. या जागांसाठी दोन्ही पक्ष तयारीला लागले आहेत.

एकूण जागा- २३०
२०१३ ची स्थिती

भाजप - 165   

काँग्रेस - 58

बसपा - 04

इतर  - 03

गेल्यावेळी भाजपाने या राज्यात मोठे यश मिळवले होते. आता मात्र विविध मुद्द्यांवर सरकारला विरोध होताना दिसत आहे.

सर्वाधिक उमेदवार रिवा जिल्ह्यात

विधानसभेच्या २३० जागांसाठी २९३२ उमेदवार रिंगणात आहेत. अद्याप बहुतांश बंडखोर मैदानात असल्याने भाजपची अडचण कायम आहे. सर्वाधिक १५८ उमेदवार रिवा जिल्ह्यात असून अलिराजपूर जिल्ह्यात सर्वात कमी १३ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत.
 

 

Web Title: The BJP-Congress are giving special attention to the 'those' 30 seats that are on the edge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.