सावधान ! या तीन राज्यांमध्ये घुसलेत दहशतवादी

By admin | Published: March 21, 2017 02:01 PM2017-03-21T14:01:51+5:302017-03-21T14:11:01+5:30

भारतात होणा-या दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या पार्श्भूमीवर बांगलादेश सरकारने केंद्रीय गृह मंत्रालयाला सतर्क करण्यासाठी एक अहवाल पाठवला आहे.

Be careful! The terrorists involved in these three states | सावधान ! या तीन राज्यांमध्ये घुसलेत दहशतवादी

सावधान ! या तीन राज्यांमध्ये घुसलेत दहशतवादी

Next

 ऑनलाइन  लोकमत

कोलकाता, दि. 21 - भारतात होणा-या दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या पार्श्भूमीवर बांगलादेश सरकारने केंद्रीय गृह मंत्रालयाला सतर्क करण्यासाठी एक अहवाल पाठवला आहे. या अहवालानुसार, 2015च्या तुलनेत 2016मध्ये पश्चिम बंगाल, आसाम आणि त्रिपुराच्या सीमावर्ती भागात  हरकत-उल-जिहादी अल-इस्लामी (HuJI) आणि जमात-उल-मुजाहिद्दीन बांगलादेश (JMB) संघटनेच्या दहशतवाद्यांची घुसखोरी तीनपट अधिक संख्येने वाढल्याचे निदर्शनास आले आहे. 
 
ऑक्टोबर 2014 मध्ये बर्दवान जिल्ह्यातील खागरागडमध्ये झालेल्या स्फोटाचे संबंध जमात-उल-मुजाहिद्दीन बांगलादेश संघटनेशी मिळतेजुळते असल्याचे एनआयएच्या तपासात समोर आले आहे, त्यामुळे बांगलादेशकडून देण्यात आलेला अहवाल महत्त्वपूर्ण मानला जात आहे. हरकत-उल-जिहादी अल-इस्लामी (HuJI) आणि जमात-उल-मुजाहिद्दीन बांगलादेश (JMB) संघटनेचे 2 हजारहून अधिक दहशतवादी या तिन्ही राज्यांमध्ये घुसल्याचे, या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यातील जवळपास 720 बंगालच्या सीमेवर आणि उर्वरित 1,290 संशयित आसाम आणि त्रिपुराच्या सीमावर्ती भागात असल्याची माहिती आहे.
 
दरम्यान, अहवालासंदर्भात प.बंगाल सरकारच्या अधिका-यांनी शंका उपस्थित केली आहे. मात्र संशयित दहशतवाद्यांची संख्या वर्तवण्यात आलेल्या अंदाजाच्या आसपास असली तरी समस्या आहेच कारण गुप्तचर यंत्रणेच्या अहवालानुसार, 2014 मध्ये 800 आणि 2015 मध्ये 659 जणांनी घुसखोरी केली आहे. यामुळे अहवालाची सत्यता पडताळून पाहत असल्याची माहिती येथील गृह विभागाच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिली आहे. तर, आसाम पोलिसांनी  चिंता व्यक्त केली आहे.  आसाममध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. गेल्या 6 महिन्यात आसाममध्ये 'जमाल उल मुजाहिद्दीन बांगलादेश' (जेएमबी) या दहशवादी संघटनेच्या 54 दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी पोलीस अधिकारी आणि आमदारांची एक समितीही स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती आसामचे अतिरिक्त पोलीस महासंचालक पल्लव भट्टाचार्य यांनी दिली.
 
दरम्यान, जेएमबीचा सेक्रेटरी इफ्तादूर रहमान हा 12 जानेवारी रोजी बनावट पासपोर्टच्या आधारे भारतात आला असून पश्चिम बंगालमधील अनेकांशी संपर्क साधून आहे. तो दिल्लीलाही जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इफ्तादूरचे खरे नाव सज्जाद हुसैन आहे. 18 जानेवारी रोजी मायमेनसिंह जिल्ह्यात एक बैठक झाली होती. या बैठकीत आसाम, पश्चिम बंगाल आणि नवी दिल्लीतील काही जण आणि जेएमबी व एयूजेआयचे दहशतवादी सहभागी झाले होते.
 
 

Web Title: Be careful! The terrorists involved in these three states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.