'बाबरी मशीद पुन्हा बांधा', उत्तर प्रदेशातील शहरांमध्ये झळकले पोस्टर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2017 02:23 PM2017-12-06T14:23:50+5:302017-12-06T14:25:10+5:30

उत्तर प्रदेशमधील काही शहरांमध्ये मशीदीच्या पुनर्बांधणीसाठी आंदोलन करणार असल्याचा दावा करणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

'Babri Masjid rebuilt', posters seen in cities in Uttar Pradesh | 'बाबरी मशीद पुन्हा बांधा', उत्तर प्रदेशातील शहरांमध्ये झळकले पोस्टर्स

'बाबरी मशीद पुन्हा बांधा', उत्तर प्रदेशातील शहरांमध्ये झळकले पोस्टर्स

Next
ठळक मुद्देउत्तर प्रदेशमधील काही शहरांमध्ये मशीदीच्या पुनर्बांधणीसाठी आंदोलन करणार असल्याचा दावा करणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत मेरठमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे.

लखनऊ- बाबरी मशीद विध्वंसाच्या घटनेला आज 25 वर्ष पूर्ण झाली. 25 वर्षांनंतर आज म्हणजेच बुधवारी संध्याकाळी उत्तर प्रदेशमधील काही शहरांमध्ये मशीदीच्या पुनर्बांधणीसाठी आंदोलन करणार असल्याचा दावा करणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाच्या अंतिम सुनावणीला मंगळवारपासून सुरुवात झाली. दरम्यान, या प्रकरणी पुढील सुनावणी ८ फेब्रुवारी २०१८ रोजी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितलं. उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत मेरठमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. पोस्टर लावण्याच्या मागे याच संघटनेचा हात असल्याचं बोललं जातं आहे. 



 

पोस्टरनुसार या आंदोलनाची चिथावणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडून (पीएफआय) दिली जाते आहे. 'हम भूल न जाएं, धोखे के 25 साल, बाबरी मस्जिद की दोबारा तामीर करो।', असं पोस्टरवर नमूद करण्यात आलं आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील मेरठ, गाझियाबाद, अलीगढ, हाथरस आणि सहारनपूरमधील शहरात आंदोलनाचे पोस्टर्स लावण्यात आल्याचं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. पीएफआय पश्चिम यूपीतील काही लोकांना एकत्र करून दिल्लीत आंदोलन करण्याची शक्यता असल्याचं पोलिसांनी म्हंटलं आहे.

बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेला आज २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर 6 डिसेंबर हा शौर्य दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा बजरंग दल आणि शिवसेनेने केली आहे. या दिवशी नागरिकांनी शांतता राखावी, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. तसंच, अशांतता पसरवण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून केला जाण्याची शक्यता लक्षात घेऊन गृह मंत्रालयाने संशयित हालचालींवर करडी नजर ठेवण्याचं आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

अयोध्येत कडेकोट सुरक्षा व्यवस्था
बाबरी मशीद विध्वंसाच्या २५ व्या वर्षपूर्तीनिमित्त सामाजिक गटांकडून अयोध्या परिसरात काही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांकडून मोठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना सतर्कतेचे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.उत्तर प्रदेश सरकारने सुरक्षाव्यवस्थेसाठी केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या (सीएपीएफ) आठ तुकड्यांची मागणी केली आहे. त्याचबरोबर रॅपिड अॅक्शन फोर्स (आरएएफ), सीआरपीएफच्या दोन तुकड्याही येथे तैनात करण्यात आल्या आहेत.

Web Title: 'Babri Masjid rebuilt', posters seen in cities in Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.