गोव्यातील खगोलशास्त्रज्ञाने लावला कृष्णविवराचा शोध!, नासाची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 03:06 AM2017-10-29T03:06:20+5:302017-10-29T03:06:27+5:30

नासाच्या (एनएएसए) अवकाशातील हबल दुर्बिणीच्या (हबल स्पेस टेलेस्कोपच्या) साहाय्याने गोव्याचे पुत्र अािण खगोलशास्त्रज्ञ डॉ. विठ्ठल तिळवी यांनी सर्वात दूरवरील कृष्णविवराचा (ब्लॅक होलचा) शोध लावला आहे.

Astronomer of Goa, invented the black hole !, NASA's recognition | गोव्यातील खगोलशास्त्रज्ञाने लावला कृष्णविवराचा शोध!, नासाची मान्यता

गोव्यातील खगोलशास्त्रज्ञाने लावला कृष्णविवराचा शोध!, नासाची मान्यता

Next

पणजी : नासाच्या (एनएएसए) अवकाशातील हबल दुर्बिणीच्या (हबल स्पेस टेलेस्कोपच्या) साहाय्याने गोव्याचे पुत्र अािण खगोलशास्त्रज्ञ डॉ. विठ्ठल तिळवी यांनी सर्वात दूरवरील कृष्णविवराचा (ब्लॅक होलचा) शोध लावला आहे. हे कृष्णविवर पृथ्वीपासून १३ दशकोटी प्रकाशवर्षे एवढ्या अंतरावर आहे.
कृष्णविवराच्या प्रचंड गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे त्यातून कोणतीही गोष्ट बाहेर पडू शकत नाही. अगदी प्रकाशसुद्धा त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे खेचला जातो. त्यामुळेच त्यांचा शोध लावणे कठीण असते. पण आधुनिक तंत्राचा वापर करून आपण कृष्णविवरांचा शोध घेऊ शकतो, असे डॉ. तिळवी यांनी सांगितले.
अनेक तारामंडळांच्या मध्यभागी कृष्णविवरे असतात; आकाशगंगेच्या मध्यभागीही कृष्णविवर आहे, असेही ते म्हणाले. या शोधाची माहिती आंतरराष्टÑीय जर्नल ‘अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नल लॅटर्स’मध्ये प्रकाशित झाली आहे. २०१३ मध्ये डॉ. तिळवी यांच्या संशोधन पथकाने ब्रह्मांडात सर्वात दूरवर असलेल्या तारामंडळाचा शोध लावला होता. आता हबल दुर्बिणीच्या सहाय्याने अािण ‘स्पॅक्ट्रोस्कोपी’चा (घटक शोधण्याचे एक खास तंत्र) वापर करून अमेरिका अािण युरोपमधील खगोल शास्त्रज्ञांच्या मदतीने डॉ. तिळवी यांनी तारामंडळात एका खास किरणांचा शोध लावला आहे. ही किरणे सामान्यत: कृष्णविवरातच तयार होतात. आकाशगंगेसारख्या तारामंडळांची निर्मिती अािण ब्रह्मांडाची रचना कशी झाली, याच्या शोधासाठी ते अत्यंत महत्त्वाचे ठरेल, असे डॉ. तिळवी यांनी सांगितले.
कृष्णविवराची पुष्टी आणि तपशीलवार माहिती मिळविण्यासाठी नासाने नुकतीच परवानगी दिली़

कृष्णविवराची पुष्टी आणि तपशीलवार माहिती मिळवण्यासाठी नासाने डॉ़ तिळवी यांच्या नेतृत्त्वाखालील नवीन प्रकल्पाला नुकतीच मान्यता दिली आहे़
नवीन निरीक्षणाने या कृष्णविवराची पुष्टी झाल्यास सर्वात दूरवरचे अर्थात ब्रम्हांडाच्या निर्मितीनंतरचे सर्वात पहिले कृष्णविवर म्हणून याची नोंद होईल, असे डॉ़ तिळवी म्हणाले़

Web Title: Astronomer of Goa, invented the black hole !, NASA's recognition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.