'भीष्म' पाकसमोर उभा ठाकणार, सीमेवर भारताची ताकद वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 10:02 AM2019-05-07T10:02:56+5:302019-05-07T10:04:05+5:30

सैन्य दलाचा टी -90 टँक ज्याला भीष्म म्हटले जाते. हा टँक रशियामध्ये बनवण्यात आला आहे.

Army Will Induct 464 Russian Origin Upgraded T 90 Bhishma, Will Deployed At Pakistan Border | 'भीष्म' पाकसमोर उभा ठाकणार, सीमेवर भारताची ताकद वाढणार

'भीष्म' पाकसमोर उभा ठाकणार, सीमेवर भारताची ताकद वाढणार

googlenewsNext

नवी दिल्ली - भारतीय सैन्यदलात लवकरच 464 टी-90 भीष्म टॅंक समाविष्ट होणार आहेत. या टॅंकसाठी रशियासोबत भारताने 13, 448 कोटी रुपयांचा करार केलेला आहे. हे सर्व टँक सैन्यदलाला 2022-26 च्या दरम्यान मिळणार आहेत. पाकिस्तानच्या सीमेवर हे भीष्म टॅंक तैनात करण्यात येणार आहे. पाकिस्तानही अशारितीचे 360 टँकर खरेदी करण्याचा विचार करत आहे. अन्य 1000 टँक रशियाकडून लायसेन्स घेतल्यानंतर एचवीएफ किटच्या साहय्याने बनविण्यात येणार आहे. 

सुरक्षा मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन टी-90 टॅंक अपग्रेड होणार असून त्याचं उत्पादन भारतात बनविण्यात येणार आहे. याच्या अधिग्रहणासाठी एक महिन्याआधी रशियाकडून लायसेन्सची मंजूरी मिळाली आहे. 464 टी-90 टँकच्या उत्पादनासाठी लवकरच ऑर्डिनेंस फॅक्टरी बोर्डच्या अंतर्गत चेन्नई येथील एचवीएफला बनविण्याची परवानगी दिली जाणार आहे. 

सैन्यदलाकडे सध्याच्या स्थितीमध्ये जवळपास 1 हजार 70 टँक आहेत. त्याचसोबत 124 अर्जुन आणि 2400 जुने टी-27 टँक उपलब्ध आहेत. 2001 नंतर पहिल्यांदा 657 टी-90 टँक रशियाकडून 8 हजार 525 कोटी रुपयांना विकत घेण्यात येत आहेत. एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, उर्वरीत 464 टँकबाबत खरेदी करार लवकरच पूर्ण केला जाईल. या नवीन टँकमुळे रात्रीच्या अंधारात लढण्याची क्षमता अधिक वाढणार आहे. ही पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर साधारण दोन-अडीच वर्षांमध्ये 64 टँक भारताच्या सैन्यदलात समाविष्ट होतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताकडून सुरु असलेली ही खरेदी प्रक्रिया भारताच्या सैन्यदलाला आणखी सुसज्ज करणार आहे. 

टी 90 टँकचे वैशिष्टे
सैन्य दलाचा टी -90 टँक ज्याला भीष्म म्हटले जाते. हा टँक रशियामध्ये बनवण्यात आला आहे. यामध्ये 125 एमएम बोरची मुख्य गन लावण्यात आली आहे. जी मिसाईल रात्रीच्या वेळीही पाच किलोमीटरपर्यंत फायर करु शकते. या टँकद्वारे दुश्मनांचे टँक आणि हेलिकॉप्टर उद्धवस्त करता येऊ शकतात. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये टी-90 भीष्म टॅँकचं संचलन दिल्लीमध्ये पहिल्यांदा करण्यात आले होते. 

 

Web Title: Army Will Induct 464 Russian Origin Upgraded T 90 Bhishma, Will Deployed At Pakistan Border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.