सैनिकी शाळांची दारे मुलींसाठी खुली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 05:44 AM2018-10-29T05:44:30+5:302018-10-29T05:44:56+5:30

१२ वर्षांच्या ६ मुलींचे प्रवेशाचे स्वप्न झाले पूर्ण

Army schools open to girls | सैनिकी शाळांची दारे मुलींसाठी खुली

सैनिकी शाळांची दारे मुलींसाठी खुली

Next

एजवेल : मिझोराममध्ये १९६१ मध्ये स्थापन झालेल्या सैनिकी शाळांची दारे प्रथम मुलींसाठी उघडल्याने इतिहास घडला आहे. १२ वर्षांच्या ६ मुलींचे प्रवेशाचे स्वप्न पूर्ण झाले असून, सैनिक, खलाशी, पायलट आदी होण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

लखनौमधील कॅप्टन मनोज पांडेय उत्तर प्रदेश सैनिकी शाळेत यंदा विद्यार्थिनींना प्रथमच प्रवेश देण्यात आला. नववीच्या २०१८-१९ शैक्षणिक सत्रासाठी २,५०० विद्यार्थिनींनी अर्ज केले होते. त्यातील १५ जणींची निवड करण्यात आली. तथापि, ही शाळा राज्य सरकारद्वारा संचलित होती. त्यानंतर मिझोराम हे राज्यही पुढे आले असून, प्रथमच येथे मुलींना प्रवेश देण्यात आला.

संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित येत असलेल्या या शाळेत पथदर्शक प्रकल्प राबवण्यात आला. आता संपूर्ण देशातील सैनिकी शाळांत मुलींना प्रवेश देण्यात येत आहे. मागील नोव्हेंबरमध्ये ती केंद्रीय विद्यालयातून घरी आली तेव्हा तिच्या आईने तिला व्हॉटस्अ‍ॅपवरील एक फॉरवर्डेड मॅसेज दाखवला. त्यात लिहिले होते की, आता मुलीही सैनिकी शाळांत प्रवेश घेऊ शकतात. तिने तर आनंदाने उडीच मारली आणि जोरात ओरडलीही. त्यावेळी तिचे वडील शांतीसैनिक म्हणून लेबनॉनमध्ये होते. तिने त्यांना ही बातमी सांगितली.

मग तिने सैनिकी शाळेत जाण्याची जय्यत तयारी सुरू केली. सामान्य ज्ञान, गणित व व्याकरण आदींचा अभ्यास केला. मागील जानेवारीमध्ये तिने एजवेल येथे इतर ३० मुलींबरोबर परीक्षाही दिली. मार्चमध्ये तिला मुलाखतीला बोलावले. तिने देशातील राज्यपाल व मुख्यमंत्र्यांची नावे धडाधड सांगितली. त्यामुळे मुलाखत घेणारे प्रभावित झाले आणि तिला सैनिकी शाळेत प्रवेश मिळाला.

वडिलांसारखे होणार... हाच ध्यास
मिझोराममध्ये सैनिकी शाळेत प्रवेश मिळालेली झोनुनपुई लालनुनपुईया तर हरखून गेली आहे. बालपणापासून तिला वडिलांसारखे लष्कर अधिकारी व्हायचे होते. ती ६ वर्षांची असल्यापासून त्यांची कॅप डोक्यावर घालून पाहायची, काठी हातात फिरवायची व शेजाऱ्या-पाजाºयांकडे ऐटीत जायची.
दररोज रात्री ती देवाकडे एकच प्रार्थना करायची- देवा, मला वडिलांसारखे कर. मला वर्दी घालू दे. मला वडिलांसारखे देशासाठी शत्रूशी लढू दे. त्या काळात तिचे वडील तिला सांगायचे ही नोकरी फक्त पुरुषांना मिळते.

Web Title: Army schools open to girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.