मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती

By Admin | Published: June 9, 2015 04:26 AM2015-06-09T04:26:10+5:302015-06-09T04:29:32+5:30

विदेश दौऱ्याहून परतताच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केंद्रीय दक्षता आयुक्त (सीव्हीसी) आणि मुख्य माहिती आयुक्त (सीआयसी) या दोन महत्त्वपूर्ण पदांवरील नियुक्तींना मंजुरी दिली आहे.

Appointment of Chief Information Commissioner | मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती

मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती

googlenewsNext

नवी दिल्ली : विदेश दौऱ्याहून परतताच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केंद्रीय दक्षता आयुक्त (सीव्हीसी) आणि मुख्य माहिती आयुक्त (सीआयसी) या दोन महत्त्वपूर्ण पदांवरील नियुक्तींना मंजुरी दिली आहे.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे माजी प्रमुख के. व्ही. चौधरी हे नवे सीव्हीसी तर विजय शर्मा हे मुख्य माहिती आयुक्त असतील. नऊ महिन्यांपेक्षा जास्त काळापासून ही पदे रिक्त होती. गुरुवारी राष्ट्रपती भवनात हे दोन्ही अधिकारी शपथ घेण्याची शक्यता आहे. त्याबाबत लवकरच अधिकृत सूचना जारी होईल.
इंडियन बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक टी.एम. भसीन यांची दक्षता आयुक्त तर माजी सामाजिक न्याय आणि अधिकार सचिव सुधीर भार्गव यांची माहिती आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. एक आठवड्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या समितीने या नावांना मंजुरी दिली होती. चौधरी यांची सीव्हीसीपदी झालेली नियुक्ती ही परंपरेला छेद देणारी आहे. आजवर आयएएस अधिकाऱ्यांचीच या पदी नियुक्ती होत आली आहे. १९६४ मध्ये सीव्हीसी ही भ्रष्टाचार प्रतिबंधक शाखा स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच महसूल विभागातील एखाद्या अधिकाऱ्याकडे हे पद सोपविण्यात आले आहे. प्रसिद्ध वकील राम जेठमलानी, प्रशांत भूषण आणि इतरांनी चौधरींच्या नियुक्तीला विरोध केला होता; मात्र सरकार निर्णयावर ठाम राहिले. चौधरी हे काळ्या पैशाच्या तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या विशेष तपास चमूचे(एसआयटी)सल्लागार म्हणून कार्यरत होते. गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये ते सीबीडीटीचे अध्यक्ष म्हणून निवृत्त झाले. (प्रतिनिधी)
————
विजय शर्मा यांना अवघे सहा महिने
विजय शर्मा हे २०१२ पासून केंद्रीय माहिती आयुक्त म्हणून कार्यरत होते. ते यावर्षी १ डिसेंबर रोजी ६५ वर्षांचे होत असून, त्यांना मुख्य माहिती आयुक्तपदासाठी केवळ सहा महिन्यांचा काळ लाभेल. सर्वात ज्येष्ठ माहिती आयुक्तांकडेच हे पद देण्याची परंपरा कायम राखत सरकारने त्यांची नियुक्ती केली आहे.

Web Title: Appointment of Chief Information Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.