माफी मागा अन्यथा सोसायटी सोडा, राम मंदिरावरील टिप्पणीमुळे मणिशंकर अय्यर यांच्या लेकीला नोटिस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 03:15 PM2024-01-31T15:15:38+5:302024-01-31T15:16:17+5:30

Ram Mandir: अयोध्येत बांधण्यात आलेल्या राम मंदिराविरोधात वक्तव्य करणं आणि उपोषण करणं  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांच्या कन्येला मगागात पडताना दिसत आहे. मणिशंकर अय्यर यांची कन्या सुरन्या अय्यर ज्या सोसायटीमध्ये राहतात, तिथून जाण्याची सूचना सोसायटीने त्यांना दिली आहे.

Apologize or else leave the society, notice to Mani Shankar Iyer's daughter over her comment on Ram temple | माफी मागा अन्यथा सोसायटी सोडा, राम मंदिरावरील टिप्पणीमुळे मणिशंकर अय्यर यांच्या लेकीला नोटिस

माफी मागा अन्यथा सोसायटी सोडा, राम मंदिरावरील टिप्पणीमुळे मणिशंकर अय्यर यांच्या लेकीला नोटिस

अयोध्येत बांधण्यात आलेल्या राम मंदिराविरोधात वक्तव्य करणं आणि उपोषण करणं  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांच्या कन्येला मगागात पडताना दिसत आहे. मणिशंकर अय्यर यांची कन्या सुरन्या अय्यर ज्या सोसायटीमध्ये राहतात, तिथून जाण्याची सूचना सोसायटीने त्यांना दिली आहे. सुरन्या अय्यर यांनी राम मंदिरातील बांधकामाविरोधात तीन दिवसांचं उपोषण केलं होतं. तसेच त्यांनी सनातन धर्माविरोधात फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यामुळे सुरन्या अय्यर वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.  

या कृतीमुळे मणिशंकर अय्य यांच्या कन्या सुरन्या यांच्याविरोधात जंगपुरा येथील सोसायटीच्या आरडब्ल्यूएने कारवाई केली आङे. आरडब्ल्यूने नोटिस पाठवून माफी मागण्यास सांगितले आहे. आरडब्ल्यूएने सांगितले की, या प्रकरणी दोघांनीही सार्वजनिकरीत्या माफी मागावी, अन्यथा सोसायटी सोडून निघून जावे. मणिशंकर अय्यर यांच्या कन्या सुरन्या ह्या दिल्लीतील जंगपुरा परिसरात राहतात.

ॉसोसायटीने केलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया व्यक्त करताना सुरन्या यांनी फेसबुकवर लिहिले की, माझं वक्तव्य माझ्या उपोषणाबाबत एका टीव्ही स्टोरीशी संबंधित होते. सर्वप्रथम संबंधित रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशन ज्या कॉलनीमधील आहे, तिथे मी राहतच नाही. दुसरी बाब म्हणजे मी सध्या प्रसारमाध्यमांशी  न बोलण्याचा निर्णय घेतला आहे. कारण भारतामध्ये प्रसारमाध्यमे सध्या केवळ विष आणि भ्रम पसरवण्याचं काम करत आहेत. भारतामध्ये मी माझं संपूर्ण जीवन विविध राजकीय विचारसरणी असलेल्या लोकांसोबत घालवलं आहे. मी मीडिया ट्रायलपासून वाचण्याचा प्रयत्न करत आहे. कारण माझ्या मते भारतामध्ये आम्हाला एका चांगल्या प्रकारच्या सार्वजनिक संवादाची आवश्यता आहे. त्यामुळे आपण शिविगाळ न करता काहीतरी विचार करण्याचा प्रयत्न करूया. 

अयोध्येमध्ये रामललांची प्राणप्रतिष्ठापना होत असताना मणिशंकर अय्यर यांची कन्या सुरन्या यांनी उपोषण केलं होतं. त्यामुळे सोसायटीतील लोक नाराज झाले होते. मी मुस्लिम बांधवांसाठी उपोषण केले होते, असे सुरन्या म्हणाल्या होत्या. त्यानंतर सोसायटीमधील लोकांनी त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती.  

Web Title: Apologize or else leave the society, notice to Mani Shankar Iyer's daughter over her comment on Ram temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.