APJ Abdul Kalam Birth Anniversary : स्वप्न सत्यात उतरवण्याची प्रेरणा देणाऱ्या 'मिसाइल मॅन'चे प्रेरणादायी विचार!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 12:02 PM2018-10-15T12:02:41+5:302018-10-15T12:10:59+5:30

जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि भारताचे अकरावे राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची आज जयंती. देशाचे 'मिसाईल मॅन' म्हणून डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना ओळखले जाते.

APJ Abdul Kalam Birth Anniversary : inspirational quotes of apj abdul kalam | APJ Abdul Kalam Birth Anniversary : स्वप्न सत्यात उतरवण्याची प्रेरणा देणाऱ्या 'मिसाइल मॅन'चे प्रेरणादायी विचार!

APJ Abdul Kalam Birth Anniversary : स्वप्न सत्यात उतरवण्याची प्रेरणा देणाऱ्या 'मिसाइल मॅन'चे प्रेरणादायी विचार!

Next

जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि भारताचे अकरावे राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची आज जयंती. देशाचे 'मिसाईल मॅन' म्हणून डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना ओळखले जाते. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडूमधील रामेश्वर येथे राहणाऱ्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम असे आहे. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे त्यांना 'लोकांचे राष्ट्रपती म्हणून ओळखलं जाऊ लागलं. कलामांनी आपलं उभं आयुष्य देशासाठी वेचले. त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे भारताला स्वतःची अशी एक वेगळी मिसाइल टेक्नोलॉजी मिळाली. भारताचे राष्ट्रपती या नात्याने कोट्यावधी देशवासियांना त्यांनी स्वप्न पाहण्यासोबतच ते पूर्ण करण्याची प्रेरणाही दिली. अशा या अलौकीक व्यक्तिमत्त्वाच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार...

1. आयुष्यात येणाऱ्या कठिण परिस्थिती ह्या तुम्हाला उध्वस्त करायला येत नसतात, त्या तुम्हाला तुमच्यामधील सुप्त क्षमता आणि ताकदीची ओळख करून देण्यासाठी येत असतात. म्हणून कठिण परिस्थितींना देखील कळू द्या कि तुम्ही देखील खूप कणखर आहात. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम

2. अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम ही जगातील सर्वात गुणकारी औषधं आहेत. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम

3. पावसात इतर पक्षी आपल्या संरक्षणासाठी आसरा शोधत असतात. पण गरूड मात्र पाऊस टाळण्यासाठी ढगांच्याही वरती जावून उडत असतो. आपली समस्या एकच असते, फक्त दृष्टीकोन वेगळा असतो. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम

4. काळा रंग अशुभ समजला जातो. पण काळ्या रंगाचाच फळा अनेक विद्यार्थांचे भविष्य उज्वल करतो. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम

5. झोपल्यावर दिसतात ती स्वप्नं नसून स्वप्नं ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला झोपूच देत नाही. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम

6. आकाशा कडे बघा आपण एकटे अजिबात नाही. संपूर्ण ब्रम्हांड तुमचा मित्र आहे. पण ते भरभरून त्यालाच देतं जो स्वप्न बघतो आणि त्यावर काम करतो. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम

7. तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही पण तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता आणि तुमच्या सवयी नक्कीच तुमचं भविष्य बदलतील. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम

8. यशस्वी लोकांच्या किंवा त्यांच्या यशाच्या गोष्टी वाचू नका, त्यात तुम्हाला फक्त संदेश मिळेल. अपयशाच्या गोष्टी वाचा त्यातून तुम्हाला नवीन यशाच्या नवीन कल्पना मिळतील. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम

9. तुमच्या पहिल्या यशानंतर अजिबात थांबू नका कारण जर तुम्ही दुसऱ्या प्रयत्नात अयशस्वी झालात तर पहिले यश हे फक्त नशिबामुळे मिळाले हे बोलायला लोक तयारच असतात. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम

10. आपल्या यशाची व्याख्या भक्कम असेल तर आपण नेहमीच अपयशाच्या दोन पावलं पुढे असू. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम
 
11. तुमच्या सहभागाशिवाय तुम्ही कधीच यशस्वी होणार नाही. आणि तुमच्या सहभागासोबत तुम्ही कधीही अपयशी होणार नाही. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम

12. शिक्षणाने माणसात सर्जनशीलता येते. सर्जनशीलतेने तुमच्यात प्रगल्भ विचार येतात. विचाराने ज्ञान वाढते, आणि ज्ञानाने माणूस महान बनतो. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम

13. जोपर्यंत चांगले शिक्षण घेणं म्हणजे चांगली नोकरी लागणे, ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातून निघत नाही. तोपर्यंत समाजात नोकरच जन्म घेतील मालक नाही. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम

14. जी इच्छा मनातून आणि शुद्ध अंतकरणातून निघत असते व जे खूप तीव्र देखील असते, त्यात खूपच जास्ती सकारात्मक ऊर्जा समाविष्ट असते. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम

15. विचार हे भांडवल, उदयोग हे मार्ग तर कठीण परिश्रम हे उत्तर आहे. - डॉ. एपीजे अब्दुल कलाम

Web Title: APJ Abdul Kalam Birth Anniversary : inspirational quotes of apj abdul kalam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.