अण्णा हजारेंच्या 'या' मागण्यांना मिळालीय तत्त्वतः मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 06:36 PM2018-03-29T18:36:45+5:302018-03-29T18:37:13+5:30

गेल्या सात दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या अण्णांनी अखेर आज उपोषण मागे घेतलं आहे. उपोषणामुळे अण्णांचं तब्बल साडे 5 किलो वजन घटलं आहे.

Anna Hazare's 'demands' approved | अण्णा हजारेंच्या 'या' मागण्यांना मिळालीय तत्त्वतः मान्यता

अण्णा हजारेंच्या 'या' मागण्यांना मिळालीय तत्त्वतः मान्यता

Next

नवी दिल्ली- गेल्या सात दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या अण्णांनी अखेर आज उपोषण मागे घेतलं आहे. उपोषणामुळे अण्णांचं तब्बल साडे 5 किलो वजन घटलं आहे. उपोषणामुळे अण्णांची प्रकृती खालावली असून, डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिलाय. अण्णांनी आज उपोषण सोडलं नसतं तर अण्णांची प्रकृती आणखी बिघडली असती, असंही डॉक्टरांनी सांगितलं आहे. अण्णांबरोबर आंदोलनात सहभागी झालेल्या जवळपास 15 आंदोलकांची प्रकृती खालावली असून त्यांच्यावर दिल्लीतल्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

अण्णा हजारे यांच्या 10 मागण्या

  • कृषिमूल्य आयोगाला स्वायत्ततेचा दर्जा देण्यासोबतच शेती मालाच्या उत्पादन खर्चावर 50 टक्के जास्त दर द्या
  • केवळ शेतीवर अवलंबून असणाऱ्या 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना दरमहा 5 हजार रुपये पेन्शन द्या
  • स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू करा
  • शेतकऱ्यांच्या पिकांचा वैयक्तिक विमा काढावा, तसेच नुकसानीचे पंचनामेही वैयक्तिकरीत्या करून भरपाई द्यावी
  • शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जावर चक्रवाढ पद्धतीनं व्याज घेऊ नये
  • शेतात राबणा-या मजुरांना उत्पादन सुरक्षेबरोबरच रोजगाराची हमी द्या
  • शेतीच्या अवजारांवरील जीएसटी माफ करा
  • लोकायुक्त आणि लोकपालाची लवकरात लवकर नियुक्ती करावी
  • राइट टू रिजेक्ट कायदा अस्तित्वात आणावा
  • राइट टू रिकॉलचा कायदा लवकरात लवकर करावा​

Web Title: Anna Hazare's 'demands' approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.