सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! परदेशी महिलांसोबत सापडला IAS अधिकाऱ्याचा पती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 06:22 PM2024-04-01T18:22:26+5:302024-04-01T18:34:10+5:30

Sex Racket Busted: सेक्स रॅकेट चालवल्याप्रकरणी IAS अधिकाऱ्याच्या पतीला ताब्यात घेण्यात आले आहे.

An IAS officer's husband has been detained by the police in connection with running a sex racket in Punjab's Ludhiana  | सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! परदेशी महिलांसोबत सापडला IAS अधिकाऱ्याचा पती

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! परदेशी महिलांसोबत सापडला IAS अधिकाऱ्याचा पती

Sex Racket Busted In Punjab: पंजाबच्या लुधियाना येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील सराभा नगर परिसरात पोलिसांनी छापेमारी केली असता सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला. खरं तर भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) एका अधिकाऱ्याच्या पतीला एका खोलीत पकडल्यानंतर तिथे अनैतिक देहविक्री व्यवसाय चालवल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, संबंधित व्यक्तीवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना एका खोलीत सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाली होती, ज्यानंतर शुक्रवारी रात्री पोलिसांना तिथे छापा टाकला. संबंधित आरोपीची पत्नी महिला आयएएस यांनी अनेक मोठ्या पदांवर काम केले आहे. 

दरम्यान, सराभा नगरमध्ये नेहमी काही लोक परदेशी महिलांसोबत ये-जा करत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. आयडीच्या माध्यमातून येथील हॉटेल्समध्ये रूम्स देखील दिल्या जात होत्या. स्थानिक लोकांकडून सूचना मिळताच पोलिसांना हॉटेलवर छापा टाकला तिथे काही लोक परदेशी महिलांसोबत आढळली. पोलिसांनी दोन पुरूष आणि दोन महिलांना रंगेहाथ पकडले. 

आरोपींच्या मुसक्या आवळल्या 
पोलिसांनी चौकशी केली असता यातील एका व्यक्तीची पत्नी ही पंजाबमध्ये आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत आहे. पोलिसांनी संबंधित महिला IAS अधिकाऱ्याला फोनवरून याबाबत माहिती दिली. मग आयएएस अधिकाऱ्याने आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात देखील या भागात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता. स्पा सेंटरचा मालक आणि व्यवस्थापक ग्राहकांना मुलींचा पुरवठा करत होते. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी कारवाई करत अनेक आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. 

Web Title: An IAS officer's husband has been detained by the police in connection with running a sex racket in Punjab's Ludhiana 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.