अमित मालवीय म्हणजे भाजपाचा स्टिव्ह स्मिथच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 03:55 AM2018-03-29T03:55:00+5:302018-03-29T03:55:00+5:30

अमित मालवीय म्हणजे भाजपाचा स्टिव्ह स्मिथ आहे असा टोला आझाद यांनी लगावला.

Amit Malviya is the BJP's Steve Smith | अमित मालवीय म्हणजे भाजपाचा स्टिव्ह स्मिथच

अमित मालवीय म्हणजे भाजपाचा स्टिव्ह स्मिथच

Next

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यापूर्वीच त्या ट्विटरवरून घोषित करणारे भारतीय जनता पार्टीच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांची तुलना पक्षाचे निलंबित खासदार कीर्ती आझाद यांनी आॅस्ट्रेलियाचा वादग्रस्त क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथशी केली आहे.
अमित मालवीय म्हणजे भाजपाचा स्टिव्ह स्मिथ आहे असा टोला आझाद यांनी लगावला. आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ बॉल टॅम्परिंगमध्ये दोषी आढळल्यानंतर त्याला पदावरून दूर करण्यात आले. अमित मालवीय यांचीही आयटी सेलच्या प्रमुखपदावरून याच प्रकारे ताबडतोब हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी कीर्ती आझाद यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली.
अमित मालवीय यांच्या ट्विटमुळे भाजपा तर अडचणीत आलीच, पण सोशल मीडियावर भाजपा व मालवीय यांची जोरात खिल्ली उडवणे सुरू झाले आहे. अमित मालवीय यांनी आता लोकसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर कराव्यात, असा टोला अनेक नेटिझन्सनी लगावला आहे.

Web Title: Amit Malviya is the BJP's Steve Smith

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा