धोक्याची घंटा! पावणेदोन कोटी लोकांना कर्करोग होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 01:25 AM2018-09-14T01:25:33+5:302018-09-14T06:31:49+5:30

जगात ९० लाखांहून अधिक लोकांचा ओढावणार मृत्यू

Alarm clock! The chance that cancer is estimated to be 1 million people | धोक्याची घंटा! पावणेदोन कोटी लोकांना कर्करोग होण्याची शक्यता

धोक्याची घंटा! पावणेदोन कोटी लोकांना कर्करोग होण्याची शक्यता

Next

लंडन : येत्या काही वर्षांमध्ये जगभरात आणखी १ कोटी ८० लाख लोकांना कर्करोग होण्याची शक्यता आहे, तसेच ९० लाखांहून जास्त लोक या आजारामुळे मरण पावतील, असा निष्कर्ष एका संशोधनातून काढण्यात आला आहे.

यासंदर्भात ब्रिटनमधील कर्करोगतज्ज्ञ जॉर्ज बटरवर्थ यांनी सांगितले की, अल्प व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांतील महिलांमध्ये आता सिगारेटची लोकप्रियता विलक्षण वाढली आहे. हा ग्राहकवर्ग मिळविण्यासाठी सिगारेट कंपन्यांनी या देशांमध्ये प्रभावी जाहिरात मोहीम राबविली आहे. कर्करोगाने सर्वांत जास्त बळी आशियामध्ये जातात. येथील काही देशांमध्ये विशिष्ट प्रकारचा कर्करोग होण्याचे प्रमाण अधिक आहे. आगामी काळात हे संकट अधिक गडद होणार आहे.

महिलांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण
कर्करोगामुळे २०१२ साली ८२ लाख लोक मरण पावले होते. त्यामध्ये वयोवृद्धांची संख्या अधिक होती. त्यानंतर दरवर्षी कर्करोगमुळे मरण पावणाऱ्यांच्या संख्येत वाढच होत आहे.

महिलांना फुफ्फुसांचा कर्करोग होण्याचे प्रमाण चीन, हंगेरी, न्यूझीलंड, अमेरिकेमध्ये मोठे आहे. महिलांकडून होणारा तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचा वापर हे त्यामागील कारण आहे. ब्रिटनमध्ये धूम्रपान करणाºयांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक आहे. जगात दर सहा महिलांपैकी एका महिलेला व दर पाच पुरुषांपैकी एकाला कर्करोग होतो.

Web Title: Alarm clock! The chance that cancer is estimated to be 1 million people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.