हवाई दलाचे AN-32 लढाऊ विमान बेपत्ता; शोधकार्य सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 04:24 PM2019-06-03T16:24:57+5:302019-06-03T16:26:54+5:30

AN-32 लढाऊ विमान आसामच्या जोरहाट येथून अरुणाचल प्रदेशसाठी निघाले होते.

Air Force An-32 transport plane goes missing near China border with 13 people onboard | हवाई दलाचे AN-32 लढाऊ विमान बेपत्ता; शोधकार्य सुरू

हवाई दलाचे AN-32 लढाऊ विमान बेपत्ता; शोधकार्य सुरू

Next

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाचे AN-32 लढाऊ विमान बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येत आहे. या विमानात आठ क्रू मेंबरसह पाच प्रवासी होते. आसामधील जोरहाटमधून उड्डाण केल्यानंतर काही वेळानंतर AN-32 लढाऊ विमानाचा संपर्क तुटला. त्यानंतर भारतीय हवाई दलाने या विमानाचा शोध सुरु केला आहे.    

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी हवाई दलाचे AN-32 लढाऊ विमान बेपत्ता झाले. यामध्ये 8 क्रू मेंमर आणि 5 प्रवासी होते. AN-32 लढाऊ विमान आसामच्या जोरहाट येथून अरुणाचल प्रदेशसाठी निघाले होते. दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी या विमानाने उड्डाण घेतले होते. तसेच, या विमानाचा एअरबेसशी शेवटचा संपर्क एक वाजता झाला होता. 


दरम्यान, भारतीय हवाई दलाने AN-32 लढाऊ विमानाचे सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. सर्च ऑपरेशनसाठी सुखोई-30 आणि सी-130 स्पेशल ऑपरेशन लढाऊ विमान लाँच करण्यात आले आहे. 

Web Title: Air Force An-32 transport plane goes missing near China border with 13 people onboard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.