बोगस बियाण्यांच्या विक्रीवर हवा अंकुश

By admin | Published: May 21, 2014 10:19 PM2014-05-21T22:19:53+5:302014-05-21T22:19:53+5:30

तेल्हारा : पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना बळीराजा शेतीच्या मशागतीस आणि बी-बियाण्यांची जुळवाजुळव करण्याच्या तयारीस लागला आहे. बाजारात विविध प्रकारचे बियाणे व रासायनिक खते येण्यास सुरुवात झाली आहे. दुकानदारांकडून आतापासूनच खते व बियाण्यांच्या टंचाईचा आभास निर्माण केला जात आहे. बोगस बियाण्यांची विक्री करण्यात तेल्हारा शहर व तालुका आघाडीवर असल्याने कृषी विभागाने बोगस बियाण्यांचा शोध लावणे तसेच बियाणे व खतांच्या काळाबाजारावर अंकुश बसविण्यासाठी ग्रामीण भागातील कृषी व्यावसायिकांच्या गोदामांची तपासणी करणे गरजेचे झाले आहे.

Air curb on selling bogass seeds | बोगस बियाण्यांच्या विक्रीवर हवा अंकुश

बोगस बियाण्यांच्या विक्रीवर हवा अंकुश

Next
ल्हारा : पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना बळीराजा शेतीच्या मशागतीस आणि बी-बियाण्यांची जुळवाजुळव करण्याच्या तयारीस लागला आहे. बाजारात विविध प्रकारचे बियाणे व रासायनिक खते येण्यास सुरुवात झाली आहे. दुकानदारांकडून आतापासूनच खते व बियाण्यांच्या टंचाईचा आभास निर्माण केला जात आहे. बोगस बियाण्यांची विक्री करण्यात तेल्हारा शहर व तालुका आघाडीवर असल्याने कृषी विभागाने बोगस बियाण्यांचा शोध लावणे तसेच बियाणे व खतांच्या काळाबाजारावर अंकुश बसविण्यासाठी ग्रामीण भागातील कृषी व्यावसायिकांच्या गोदामांची तपासणी करणे गरजेचे झाले आहे.
तालुक्यात मध्य प्रदेशातून आलेल्या बोगस बियाण्यांचा व्यापार करणारे एक मोठे रॅकेटच सक्रिय आहे. या बोगस बियाण्यांची विक्री करताना दुकानदार शेतकर्‍यांना त्या मालाची पावती देत नाहीत. किंमत कमी असते म्हणून विनापावती बियाणे घेतलेल्या शेतकर्‍यांना ते बियाणे बोगस असल्याचे पेरणी केल्यानंतर लक्षात येते. फसगत झालेल्या शेतकर्‍यांवर महागडे बियाणे घेऊन दुबार पेरणीचे संकट येते. मोठ्या प्रमाणात बोगस बियाण्यांचा व्यापार होत असला तरी कृषी विभागाचे त्याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. कृषिसेवा केंद्रांवर बोगस बियाण्यांची विक्री होऊ नये म्हणून प्रत्येक दुकानांवर कृषी विभागाचा कर्मचारी ठेवण्यात येत असल्याचे कागदी घोडे नाचविले जातात; मात्र प्रत्यक्षात या दुकानांमध्ये कृषी विभागाचा कर्मचारी दिसून येत नाही. कृषी व्यावसायिकांची गोदामे शहरात तर आहेतच शिवाय ग्रामीण भागातही गोदामांचे मोठ्या प्रमाणात जाळे असल्याने खते व बियाण्यांचा काळाबाजार दरवर्षीच होत असल्याचे एकंदरित चित्र आहे. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात बियाणे येत असताना या बियाण्यांचा तुटवडा असल्याचा डांगोरा पिटला जात आहे. त्यामुळे शेतकरी चढ्या दराने बियाणे खरेदी करून मोकळे होत आहेत. यासंदर्भात कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची आवश्यकता आहे; परंतु प्रत्यक्षात या विभागाकडून कोणतेही पाऊल उचलले जात नसल्याचे दिसून येत आहे. शेतकर्‍यांची लूट थांबविण्यासाठी कृषी विभागाने त्यांना मार्गदर्शन करण्याची गजर आहे. शिवाय दक्ष राहून काळाबाजारावर नियंत्रण मिळविण्याचीही गरज आहे. (शहर प्रतिनिधी)
--------
कोट
तालुक्यात कुठेही बोगस बियाण्यांची विक्री होता कामा नये, यासाठी कृषी विभाग आवश्यक ती काळजी घेत आहे. बोगस बियाण्यांची विक्री करणार्‍यांवर कायद्याच्या चौकटीत राहून कठोर कारवाई केली जाईल.
- रामराजे घोळवे, तालुका कृषी अधिकारी, तेल्हारा

Web Title: Air curb on selling bogass seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.