सानपाडामध्ये अतिक्रमणावर कारवाई

By admin | Published: August 23, 2015 08:40 PM2015-08-23T20:40:12+5:302015-08-23T20:40:12+5:30

नवी मुंबई : सानपाडा रेल्वे स्टेशनसमोर खाद्यपदार्थ व इतर विक्रेत्यांनी केलेल्या अतिक्रमणावर सिडकोने कारवाई केली. दुकानांबाहेरील शेड हटवून फ्रीज, खुर्ची, टेबल व इतर साहित्य जप्त केले आहेत.

Action on encroachment in Sanpada | सानपाडामध्ये अतिक्रमणावर कारवाई

सानपाडामध्ये अतिक्रमणावर कारवाई

Next
ी मुंबई : सानपाडा रेल्वे स्टेशनसमोर खाद्यपदार्थ व इतर विक्रेत्यांनी केलेल्या अतिक्रमणावर सिडकोने कारवाई केली. दुकानांबाहेरील शेड हटवून फ्रीज, खुर्ची, टेबल व इतर साहित्य जप्त केले आहेत.
सिडकोने सानपाडा रेल्वे स्टेशनच्या बाहेर नागरिकांच्या सुविधेसाठी किऑस्क (छोटी दुकाने) तयार केली आहेत. नागरिकांना खाद्यपदार्थ व इतर वस्तू सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी हे सुनियोजित मार्केट तयार केले आहे. परंतु येथील व्यावसायिकांनी दुकानांच्या समोरील जागेवर अतिक्रमण केले आहे. टेम्प्टेशन, स्क्वेअर व इतर हॉटेलचालकांनी दुकानाबाहेर मोठे तंबू ठोकले आहेत. सर्वच दुकानदारांनी ५ फुटांपासून ५० फुटांपर्यंत जागेवर अतिक्रमण केले आहे. यामुळे रेल्वे स्टेशन परिसर बकाल झाला आहे. सिडकोने शुक्रवारी या अतिक्रमणावर कारवाई केली. जेसीबीच्या सहाय्याने शेड हटविण्यात आली. सिडकोने हॉटेलचालकांकडील फ्रीज, खुर्ची, टेबल व इतर साहित्यही जप्त केले आहेत.
सिडकोने शुक्रवारी कारवाई सुरू केल्यानंतर येथील अनेक फेरीवाल्यांनी तेथून पळ काढला. परंतु शनिवारी पुन्हा फळ, भाजी व इतर विक्रेत्यांनी दुकानांच्या बाहेर पुन्हा अतिक्रमण केले आहे. हॉटेल चालकांनीही एक दिवसामध्ये पुन्हा शेड उभे केले असून संबंधितांवर ठोस कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
फोटो
२२सानपाडा कारवाई, नावाने आहे

Web Title: Action on encroachment in Sanpada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.