ओडिशातील ६७ आमदारांवर गुन्हे, प्रतिज्ञापत्रांच्या आधारे मिळाली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 04:14 AM2019-05-29T04:14:26+5:302019-05-29T04:14:32+5:30

यंदाच्या ओडिशा विधानसभेत अपहरण, खून, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेले ६७ आमदार आहेत.

67 MLAs from Odisha were arrested on the basis of crime, affidavits | ओडिशातील ६७ आमदारांवर गुन्हे, प्रतिज्ञापत्रांच्या आधारे मिळाली माहिती

ओडिशातील ६७ आमदारांवर गुन्हे, प्रतिज्ञापत्रांच्या आधारे मिळाली माहिती

Next

भुवनेश्वर : यंदाच्या ओडिशा विधानसभेत अपहरण, खून, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेले ६७ आमदार आहेत. नव्याने निवडून आलेल्या निम्म्यापेक्षा अधिक आमदारांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. गुन्ह्यांची नोंद असलेल्या आमदारांमध्ये ११ टक्के वाढ झाली आहे.
असोसिएशन आॅफ डेमॉक्रेटिक रिफॉर्म्सने अहवालात म्हटले आहे की, गेल्या विधानसभा निवडणुकीत ५२ आमदारांनी आपल्यावर गुन्हे असल्याचे जाहीर केले होते. एकूण आमदारांमध्ये हे प्रमाण ३५ टक्के होते. यंदा त्यात वाढच झाली.
नव्या विधानसभेतील ६७ आमदारांवर गुन्हे दाखल आहेत. त्यांनी निवडणूक अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे. त्यातील ४९ जणांवर अपहरण, खून, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. गेल्या विधानसभेत ५२ आमदारांवर
(३५ टक्के) गुन्हे होते. यंदा ६७ आमदारांवर गुन्हे असून, हे प्रमाण ४६ टक्के आहे. (वृत्तसंस्था)
>सर्वपक्षीय गुन्हेगारी
मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील बिजू जनता दलाच्या आमदारांवर गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे.
या पक्षाच्या ११२ आमदारांपैकी ४६ आमदारांवर गुन्हे दाखल असल्याचे त्यांच्या प्रतिज्ञापत्रावरून दिसून येत आहे. त्यातील ३३ जणांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
भाजपच्या ३३ पैकी १४ जणांवर गुन्हे असून त्यातील १०
जणांवरचे गुन्हे गंभीर आहेत. कॉँग्रेसच्या नव्याने निवडून आलेल्या ९ पैकी ६ आमदारांवर गुन्हे आहेत.

Web Title: 67 MLAs from Odisha were arrested on the basis of crime, affidavits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.