छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीत ६५,००० जवानांचा बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 05:11 AM2018-11-02T05:11:18+5:302018-11-02T05:11:45+5:30

नक्षल प्रभावित छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी केंद्रीय व राज्य पोलीस दलांचे सुमारे ६५,००० जवान तैनात करण्यात येणार आहेत.

65,000 security personnel in Chhattisgarh assembly elections | छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीत ६५,००० जवानांचा बंदोबस्त

छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीत ६५,००० जवानांचा बंदोबस्त

Next

नवी दिल्ली : नक्षल प्रभावित छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी केंद्रीय व राज्य पोलीस दलांचे सुमारे ६५,००० जवान तैनात करण्यात येणार आहेत. ९० सदस्यांच्या छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यांत मतदान होणार आहे.
पहिल्या टप्प्यात १२ नोव्हेंबर रोजी, तर दुसऱ्या टप्प्यात २० रोजी मतदान होईल. बिजापूर व सुकमा जिल्ह्यांत माओवाद्यांनी दोन हल्ल्यांमध्ये ९ सुरक्षा कर्मचारी व डीडी न्यूजच्या एका कॅमेरामनचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा अधिकाºयांनी पोलिसांना निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

अधिकाºयांनी सांगितले की, सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, एसएसबी, सीआयएसएफ व आरपीएफ यासारख्या केंद्रीय सुरक्षा दलांच्या व राज्य पोलीस दलांच्या काही तुकड्या रायपूर येथे दाखल झाल्या आहेत. हे सर्व या आठवड्यात त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी व मतदान केंद्रांवर पोहोचतील. एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, राज्यात पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी केंद्रीय व राज्य पोलीस दलांच्या सुमारे ६५० तुकड्या तैनात केल्या जाणार आहेत. याशिवाय छत्तीसगढ पोलीस कर्मचाºयांनाही तैनात केले जाणार आहे. राज्य पोलीस किंवा केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या एका तुकडीत १०० कर्मचारी असतात.

मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
नक्षल प्रभावित दंतेवाडा जिल्ह्यात नक्षली हल्ल्यानंतर उद्भवलेल्या स्थितीचा मुख्यमंत्री रमणसिंह यांनी आढावा घेतला. सूत्रांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी रायपूर येथील आपल्या निवासस्थानी वरिष्ठ अधिकाºयांसमवेत चर्चा केली. नक्षली हिंसेचा मुकाबला करण्यासंबंधी तसेच सुरक्षा व कायदा-सुव्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला. या बैठकीस मुख्य सचिव अजय सिंह, गृह विभागाचे प्रमुख सचिव अमिताभ जैन, मुख्यमंत्र्यांचे प्रमुख सचिव अमनकुमार सिंह, पोलीस महासंचालक ए.एन. उपाध्याय, डी.एम. अवस्थी व अशोक जुनेजा यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Web Title: 65,000 security personnel in Chhattisgarh assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.