मोदी राजवटीत रोज ४७ शेतक-यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 05:52 AM2018-03-13T05:52:37+5:302018-03-13T05:52:37+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धोरणे शेतक-यांना उद््ध्वस्त करणारी असून, मोदी सत्तेवर आल्यापासून देशभरात दररोज ४७ शेतकरी आत्महत्या करत असल्याचे आकडेवारीवरुन दिसते असा आरोप काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.

47 farmers suicides every day during Modi regime | मोदी राजवटीत रोज ४७ शेतक-यांची आत्महत्या

मोदी राजवटीत रोज ४७ शेतक-यांची आत्महत्या

Next

- शीलेश शर्मा 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धोरणे शेतक-यांना उद््ध्वस्त करणारी असून, मोदी सत्तेवर आल्यापासून देशभरात दररोज ४७ शेतकरी आत्महत्या करत असल्याचे आकडेवारीवरुन दिसते असा आरोप काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.
किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकºयांचा नशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर बोलताना सुरजेवाला म्हणाले की, शेतकºयांना दिलेली आश्वासने सरकार पूर्ण करू शकलेले नाही. शेतकºयांच्या प्रश्नांसंदर्भात मोदी सरकार असंवेदनशील बनले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या अध्यक्षांबरोबर नौकाविहार करण्यात मग्न आहेत तर दुसºया बाजूला शेतकरी आपली दुस्थिती सरकारसमोर मांडण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर उतरला आहे. महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेला सोमवारी ८८ वर्षे पूर्ण होत असतानाच शेतकºयाला आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी १८० किलोमीटर चालत सरकारच्या दारी जावे लागते, हे दुर्दैवी आहे.
काँग्रेसने म्हटले आहे की, एक जानेवारी २०१७पर्यंत महाराष्ट्रामध्ये २,४१४ शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. इतकी भीषण स्थिती असूनही मोदी व अरुण जेटली यांनी शेतकºयांना कर्जमाफी देण्यास नकार दिला. शेतमालाची निर्यात घटली व आयात वाढली आहे. मोदी सरकार शेतकºयांऐवजी दलालांची मदत करीत आहे. २०१३-१४या वर्षात काँग्रेस सरकारच्या काळात तेव्हा निर्यातीतून ४२.२३ अब्ज डॉलर व आयातीतून १५.०३ अब्ज डॉलरची उलाढाल होत होती. २०१६-१७या कालावधीत निर्यातीतून ३३.८२ अब्ज डॉलर व आयातीतून २५.०९ अब्ज डॉलर इतकी उलाढाल झाली. डाळ व गव्हाच्या व्यापाºयांना फायदा व्हावा यासाठी मोदी सरकारने इम्पोर्ट ड्युटी शून्यावर आणली. या कृतीतून मोदी सरकार शेतकरीविरोधी धोरण राबवत असल्याचे स्पष्ट होते.
>शेतकºयांच्या स्थितीवर अहवाल
शेतकºयांचे न सुटलेले प्रश्न व त्याबाबत मोदी सरकारने दाखविलेली निष्क्रिय्रता हे २०१९च्या लोकसभा निवडणुकीत प्रचाराचे मुख्य मुद्दे बनविण्याचा विचार काँग्रेस पक्ष करत आहे. शेतकºयांच्या स्थितीबद्दल येत्या १६ मार्चपासून सुरू होणाºया काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात अधिवेशनात खास चर्चा करण्यात येईल व त्याचा एक अहवाल तयार करण्यात येणार आहे. शेतकºयांची स्थिती सुधारण्यासाठी नेमके काय करायला हवे, सत्तेत आल्यानंतर शेतकºयांसाठी काँग्रेस पक्ष काय करणार आहे, याबाबत अहवालात माहिती देण्यात येईल.

Web Title: 47 farmers suicides every day during Modi regime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.