२४ धार्मिक नेते पंतप्रधानांच्या भेटीला; भारताच्या आंतरधर्मीय एकतेचा जगाला संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 06:56 AM2024-02-06T06:56:45+5:302024-02-06T06:57:17+5:30

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी कडाडून टीका केली

24 religious leaders visit the Prime Minister narendra modi; India's message of interfaith unity to the world | २४ धार्मिक नेते पंतप्रधानांच्या भेटीला; भारताच्या आंतरधर्मीय एकतेचा जगाला संदेश

२४ धार्मिक नेते पंतप्रधानांच्या भेटीला; भारताच्या आंतरधर्मीय एकतेचा जगाला संदेश

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : “अनेक दशके तुम्ही इथे (सत्ताधारी बाकांवर) बसला होता, पण आता तुम्ही अनेक दशके तिथे (विरोधी बाकांवर) राहण्याचा संकल्प केला आहे. लोक तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुम्हाला तिथेच ठेवतील. तुम्ही अधिक उंची गाठाल आणि लवकरच लोकसभेच्या प्रेक्षागृहात दिसाल,” अशी खोचक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केली. 

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी कडाडून टीका केली. “काही विरोधी नेते त्यांच्या संसदीय जागा बदलण्यास उत्सुक आहेत, तर काही राज्यसभेत जाण्याचा विचार करत आहेत,” अशी खोचक टीकाही त्यांनी केली. “विरोधकांनी घेतलेल्या ठरावाचे मी कौतुक करतो. त्यांच्या भाषणातील प्रत्येक शब्दाने माझ्या आणि देशाच्या विश्वासाला पुष्टी दिली आहे की, त्यांनी दीर्घकाळ तेथे (विरोधी पक्षात) राहण्याचा निर्धार केला आहे,” असे मोदी म्हणाले.

अर्थसंकल्पीय अधिवेशन ही काही विधायक सूचना करण्याची चांगली संधी होती; परंतु विरोधी पक्षाच्या सदस्यांनी ही चांगली संधी गमावली आहे. तुम्ही देशाचा भ्रमनिरास करून निघून गेलात... नेते बदलले, पण तोच सूर कायम आहे,” असे ते म्हणाले. निवडणुकीच्या वर्षात विरोधी पक्ष जनतेला काही संदेश देऊ शकले असते, असे सांगून मोदी म्हणाले की, विरोधकांच्या सध्याच्या स्थितीला काँग्रेस जबाबदार आहे. “काँग्रेसला चांगल्या विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याची चांगली संधी होती, पण त्या भूमिकेत ते अपयशी ठरले.

काँग्रेसची ‘रद्द करा’ संस्कृती
काँग्रेस ‘रद्द करा’ संस्कृतीत इतकी अडकली आहे की ती देशाचे यशही ‘रद्द’ करत आहे. जेव्हा आपण देश तिसरी अर्थव्यवस्था बनत असल्याबद्दल बोलतो तेव्हा काँग्रेसचे सहकारी खिल्ली उडवितात. २०१४ च्या अंतरिम अर्थसंकल्पात तत्कालीन यूपीए सरकारच्या अर्थमंत्र्यांनीही भारत जगातील ११वी अर्थव्यवस्था बनल्याबद्दल अभिमान व्यक्त केला होता आणि पुढील काळात भारताचा जीडीपी अमेरिका आणि चीननंतर तिसऱ्या क्रमांकावर नेण्याची योजना आखली होती, याची आठवण करून दिली. आज भारत पाचवी आर्थिक महासत्ता झाल्याचा अभिमान त्यांना वाटत नाही, असे मोदी म्हणाले.

तुम्ही अपयशी ठरलात...
nपंतप्रधान म्हणाले की, काँग्रेस तेच तेच उत्पादन वारंवार लाँच करण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे लवकरच त्यांना ‘दुकान बंद’ करावे लागेल, अशी टीकाही मोदी यांनी केली. “निवडणुकीची वेळ आहे. तुम्ही जरा जास्त मेहनत करून काहीतरी नवीन आणून लोकांना संदेश पाठवायला हवा होता. मात्र, तुम्ही सपशेल अपयशी ठरलात. 
nमाझी तुम्हाला हीच शिकवण आहे. विरोधकांच्या सद्य:स्थितीला काँग्रेस पक्ष जबाबदार आहे. काँग्रेसला चांगला विरोधक बनण्याची संधी मिळाली. मात्र, गेल्या दहा वर्षांत त्यांची जबाबदारी पार पाडण्यात ते अपयशी ठरले आहेत,” असे मोदी यांनी निक्षून सांगितले.

राम मंदिराच्या रूपाने परंपरांना नवीन ऊर्जा
आमच्या सरकारने पहिल्या कार्यकाळात यूपीएच्या काळातील खड्डे भरण्यात वेळ आणि शक्ती खर्च केली, दुसऱ्या कार्यकाळात नवीन भारताचा पाया घातला आणि तिसऱ्या कार्यकाळात विकसित भारताच्या उभारणीला नवी चालना देईल, असे मोदी म्हणाले. कलम ३७० रद्द करणे, नारी शक्ती वंदन कायद्याची अंमलबजावणी, नवे कायदे आदी सरकारच्या उपलब्धींचा उल्लेख मोदी यांनी केला. दुसऱ्या कार्यकाळात भगवान राम केवळ त्यांच्या घरी परतले नाहीत, तर एक मंदिर बांधले गेले जे भारताच्या महान सांस्कृतिक परंपरांना नवीन ऊर्जा देत राहील,” असे ते म्हणाले.  

इंडियन मायनॉरिटीज फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली २४ धार्मिक नेत्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि सांगितले की, ते भारतातील आंतरधर्मीय एकतेचा संदेश बाहेरच्या जगापर्यंत पोहोचवू इच्छित आहेत. शिष्टमंडळात शीख, जैन, ख्रिश्चन, पारशी समुदायांचे प्रतिनिधी, अखिल भारतीय इमाम संघटनेचे प्रमुख इमाम उमर अहमद इलियासी आणि महाबोधी आंतरराष्ट्रीय ध्यान केंद्राचे संस्थापक अध्यक्ष भिक्खू संघसेना यांचा समावेश होता. आज संसदेत धार्मिक नेत्यांच्या शिष्टमंडळाला भेटून आनंद झाला, असे मोदी म्हणाले.

Web Title: 24 religious leaders visit the Prime Minister narendra modi; India's message of interfaith unity to the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.