ब्लू व्हेलच्या नादात 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या, हातावर रेखाटलं होतं ब्लू व्हेलचं चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 04:47 PM2017-08-31T16:47:22+5:302017-08-31T16:48:00+5:30

19 वर्षीय तरुणाने ऑनलाइन गेम ब्लू व्हेलच्या नादात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तामिळनाडूमधील मदुराई येथे ही घटना घडली आहे

19-year-old man commits suicide due to blue whale, draws on his hand | ब्लू व्हेलच्या नादात 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या, हातावर रेखाटलं होतं ब्लू व्हेलचं चित्र

ब्लू व्हेलच्या नादात 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या, हातावर रेखाटलं होतं ब्लू व्हेलचं चित्र

googlenewsNext

मदुराई, दि. 31 - 19 वर्षीय तरुणाने ऑनलाइन गेम ब्लू व्हेलच्या नादात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तामिळनाडूमधील मदुराई येथे ही घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापुर्वी तरुणाने हातावर ब्लू व्हेलचं चित्र रेखाटलं होतं. त्याखाली त्याने ब्लू व्हेल असं लिहिलेलं देखील होतं. तसंच सुसाईट नोटमध्ये 'Blue Whale - This is not a game but danger. Once you enter, you can never exit' असं लिहिलं होतं.

आत्महत्या करणा-या तरुणाचं नाव विग्नेश असून एका खासगी महाविद्यालयात तो शिकत होता. विग्नेश नेहमीपेक्षा जास्त वेळ मोबाईलवर घालवू लागला होता अशी माहिती त्याच्या मित्रांनी पोलिसांना दिली आहे. ब्लू व्हेलच्या नादात आत्महत्या केल्याची तामिळनाडूमधील ही पहिली घटना आहे. ब्लू व्हेल गेमच्या नादात आपलं आयुष्य संपवण्याची एका महिन्यातील ही तिसरी घटना आहे. मुंबई, उत्तर प्रदेश आणि केरळमध्ये तीन तरुणांनी आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली आहे. 

काय आहे ब्ल्यू व्हेल चॅलेंज गेम?
ब्लू व्हेल हा एक व्हिडीओ गेम असून 2013मध्ये रशियामधून या खेळाची सुरुवात झाली. हा गेम खेळणा-याला 50 चॅलेंजेस मिळतात. फिलिपनं लोकांसोबत विशेष करुन 20 वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींना टार्गेट करुन त्यांच्यासोबत ऑनलाइन संपर्क वाढवण्यास सुरुवात केली. याद्वारे तो लोकांना स्वतःबाबत माहिती देण्यास सांगायचा, स्काइपवर त्यांच्यासोबत बोलायचा.  यावेळी तो कमकुवत लोकांची निवड करायचा. लोकांची निवड झाल्यानंतर अॅडमिन खेळाडूंना रोज एक टास्क देतात, हा टास्क 50 दिवसांमध्ये पूर्ण करायचा असतो. गेमची सुरुवात सोप्या टास्कने होते. मात्र यानंतर कठीण-कठीण टास्क दिले जातात. टास्कमध्ये हाताच्या नसा कापणे, जनावराला मारणे व अंतिम टप्प्यात आत्महत्या करायला सांगितली जाते.  प्रत्येक टप्पा पार केल्यानंतर फोटोंच्या रुपात स्टोर करायचा असतो.

यामध्ये कुटुंब व मित्रांशी संपूर्ण संबंध तोडणे, स्वत:ला इजा करून घेणे यांचा समावेश आहे. याचे चित्रण गेमच्या क्युरेटरला पाठवावे लागते, जेणेकरून दिलेले आव्हान पूर्ण होण्याची खात्री होते. अखेर पर्यवेक्षक सहभागींना आत्महत्या करण्याचे आव्हान देतो. गेम डाउनलोड केला की, तो डिलिट होत नाही. वापरकर्त्याची वैयक्तिक माहितीदेखील हॅक होण्याची शक्यता असते. एक-एक टप्पा पार केल्यानंतर फोटोंच्या स्वरुपात पुरावा द्यावा लागतो त्यानंतरच खेळाडू पुढील टप्प्यासाठी पात्र ठरतो. 

Web Title: 19-year-old man commits suicide due to blue whale, draws on his hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.