जगातील सर्वात प्रदूषित 15 शहरांमध्ये भारताच्या 14 शहरांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2018 09:34 AM2018-05-02T09:34:52+5:302018-05-02T09:34:52+5:30

लिस्टमध्ये सगळ्यात टॉपवर कानपूर शहर आहे.

14 of world's 15 most polluted cities in India | जगातील सर्वात प्रदूषित 15 शहरांमध्ये भारताच्या 14 शहरांचा समावेश

जगातील सर्वात प्रदूषित 15 शहरांमध्ये भारताच्या 14 शहरांचा समावेश

Next

नवी दिल्ली- जिनीवामध्ये ग्लोबल एअर पॉल्यूशनकडून (डब्ल्यूएचओ)  2016साठी जगातील सगळ्यात 15 प्रदूषित शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भारतातील 14 शहरांचा समावेश आहे. या लिस्टमध्ये सगळ्यात टॉपवर कानपूर शहर आहे. तर दिल्ली सहाव्या स्थानी आहे. डब्ल्यूएचओच्या माहितीनुसार, 2010 ते 2014 मध्ये दिल्लीमध्ये प्रदूषण पातळीत सुधारणा झाली होती पण त्यामध्ये 2015मध्ये परिस्थिती पुन्हा बिघडली. कानपूर, फरिदाबाद, गया, पाटणा, आग्रा, मुझ्झफरपूर, श्रीनगर, जयपुर, जोधपुर यासारख्या शहरात प्रदूषणाची पातळी सर्वाधिक आहेत. भारताबरोबरच कुवेत, चीन, मंगोलिया या देशातील शहरांचाही समावेश आहे.

2016च्या तुलनेत 2017 मध्ये वायू प्रदूषणमध्ये सुधारणा झाली, असा दावा सेंट्रल पॉल्युशन कंट्रोल बोर्डाने केला आहे. पण अजूनही बोर्डाने 2017 च्या हवेत असलेल्या पीएम 2.5 चा डेटा जारी केला आहे. 
2016च्या शेवटी वायू प्रदूषणची समस्या सोडविण्यासाठी अनेक पावलं उचलली गेली. ऑक्टोबरमध्ये ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन, डिसेंबर 2015मध्ये इन्वारमेंटल कंपनसेशन चार्ज आणि प्रदूषण नियंत्रणासाठी एनसीआर शहरांमध्ये प्रदूषण नियंत्रणाचे उपाय अशा विविध गोष्टी सहभागी आहेत. डब्ल्यूएचओचा रिपोर्ट 2016 पर्यंतचा असल्याने प्रदूषण नियंत्रणासाठी केलेल्या उपायांच्या परिणामाची नेमकी माहिती समोर आली नाही.  
2010च्या रिपोर्टनुसार दिल्ली दुनियेतील सर्वात प्रदूषित शहर होतं. त्यानंतर पेशावर आणि रावलपिंडीचा नंबर होता. त्यावेळी दुनियेतील 10 सर्वात प्रदूषित शहरांमध्ये भारताच्या इतर शहरांमध्ये फक्त आगराचा समावेश होता. 2011 च्या रिपोर्टमध्येही दिल्ली व आगरा प्रदूषित शहरांच्या यादीत होतं व उलानबाटर दुनियेतील सर्वात प्रदूषित शहर होतं. 2012मध्ये परिस्थिती बदलायला सुरूवात झाली. दुनियेतील 20 सर्वात प्रदूषित शहरांमध्ये एकट्या भारताच्या 15 शहरांचा सहभाग आहे. 2013, 2014 आणि 2015मध्ये दुनियेतील 20 सर्वात प्रदूषित शहरांमध्ये भारताच्या चार ते सात शहरांचा समावेश होता. 

Web Title: 14 of world's 15 most polluted cities in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.