Corona Virus : "डिसेंबर 2023 मध्ये कोरोनामुळे 10 हजार लोकांचा मृत्यू"; WHO चा धडकी भरवणारा रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 02:23 PM2024-01-11T14:23:18+5:302024-01-11T14:32:23+5:30

Corona Virus : जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार, 2023 च्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये कोरोनामुळे जगभरात सुमारे 10,000 लोकांचा मृत्यू झाला

10 thousand people died due to corona virus or covid 19 in december 2023 says who | Corona Virus : "डिसेंबर 2023 मध्ये कोरोनामुळे 10 हजार लोकांचा मृत्यू"; WHO चा धडकी भरवणारा रिपोर्ट

Corona Virus : "डिसेंबर 2023 मध्ये कोरोनामुळे 10 हजार लोकांचा मृत्यू"; WHO चा धडकी भरवणारा रिपोर्ट

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा एकदा लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार, 2023 च्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये कोरोनामुळे जगभरात सुमारे 10,000 लोकांचा मृत्यू झाला. हा आकडा नोव्हेंबरच्या तुलनेत खूपच जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेने यामागे सुट्ट्यांमध्ये होणारी गर्दी हे कारण सांगितलं आहे. सुट्टीच्या काळात कोरोना व्हायरसचा झपाट्याने प्रसार होतो.

डब्ल्यूएचओ प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांच्या मते, रुग्णालयात दाखल झालेल्या लोकांची संख्या सुमारे 42 टक्क्यांनी वाढली, जी प्रामुख्याने युरोप आणि अमेरिकेत दिसून आली. ते म्हणाले की, साथीच्या रोगाच्या पीकनुसार डिसेंबरमध्ये 10 हजार मृत्यू खूप कमी आहेत, मात्र अनेक लोकांचा जीव वाचवता आला असता. 

"कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ"

डब्ल्यूएचओ प्रमुखांनी असंही सांगितलं की अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यांनी सरकारांना कोरोनाबाबत बेफिकीर न राहता उपचार आणि लस लोकांच्या आवाक्यात ठेवण्यास सांगितलं. कोरोनाच्या J.N व्हेरिएंटबाबत गेब्रेसस म्हणाले की, सध्या कोरोनाचा हा व्हेरिएंट खूप पसरत आहे. हा एक Omicron व्हायरस आहे आणि सध्या उपलब्ध असलेल्या लसी या व्हेरिएंटचा प्रसार रोखू शकतात.

WHO ने लोकांना लस घेण्याचे, मास्क लावण्याचे आणि खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. असेही सांगण्यात आले की, उपलब्ध लसी संसर्ग होण्यापासून संरक्षण करू शकत नाहीत परंतु ते निश्चितपणे रुग्णालयात दाखल होण्याची किंवा मृत्यूची शक्यता कमी करतात.

वाढत आहेत श्वसनाचे आजार 

डब्ल्यूएचओमधील कोविड-19 साथीच्या आजारासाठी  टेक्निकल लीड मारिया वान केरखोव यांनी सांगितलं की, कोरोना व्हायरसमुळे जगभरात श्वसनाचे आजार तसेच फ्लू, राइनोव्हायरस आणि न्यूमोनियाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हिवाळ्यात सर्दी, ताप आणि थकवा जाणवणे ही बाब सर्रास असते, मात्र यावर्षी विशेषत: विविध प्रकारचे रोगजंतू पसरत असल्याने काळजी घेण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं.

केरखोव म्हणाल्या की, आम्हाला वाटतं ही वाढ जानेवारीतही कायम राहू शकते कारण उत्तर ध्रुवावर अजूनही हिवाळा आहे. तथापि, दक्षिण ध्रुवावर कोरोना व्हायरसची प्रकरणंही वाढत आहेत, जिथे सध्या उन्हाळा आहे. या आठवड्यात ऑस्ट्रेलियामध्ये कोरोना प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. राज्य सरकारांनीही कोरोनाबाबत इशारे देण्यात आले आहेत. 
 

Web Title: 10 thousand people died due to corona virus or covid 19 in december 2023 says who

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.