दहा गुंठे मिरचीतून दीड लाखाचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:35 AM2018-02-22T00:35:12+5:302018-02-22T00:37:25+5:30

बदलत्या काळात कृषीक्षेत्राची वेगाने प्रगती होत आहे. या व्यवसायात अनेक  सकारात्मक बदलही होत आहेत. त्र्यंबकेश्वरसारख्या आदिवासीबहुल तालुक्यातील शेतकरी वेगवेगळे प्रयोग करू लागले आहेत. अनेक शेतकरी त्यात यशस्वीही होऊ लागले आहेत.

 The yield of one and a half cubits | दहा गुंठे मिरचीतून दीड लाखाचे उत्पन्न

दहा गुंठे मिरचीतून दीड लाखाचे उत्पन्न

Next
ठळक मुद्दे तळवाडे गावातील शेतकरी तानाजी बोडकेचा दहा गुंठे शेतीत वेगळा प्रयोग मिरचीला ३० रूपये प्रतिकिलो बाजारभाव ; तब्बल एक लाख ६६ हजारांचे उत्पन्न शेतीला माहिती तंत्रज्ञानाची जोड दिल्यास दहा गुंठ्यातील मिरचीही चांगले उत्पन्न मिळवून देऊ शकते

वसंत तिवडे
बदलत्या काळात कृषीक्षेत्राची वेगाने प्रगती होत आहे. या व्यवसायात अनेक  सकारात्मक बदलही होत आहेत. त्र्यंबकेश्वरसारख्या आदिवासीबहुल तालुक्यातील शेतकरी वेगवेगळे प्रयोग करू लागले आहेत. अनेक शेतकरी त्यात यशस्वीही होऊ लागले आहेत.
तालुक्यातील तळवाडे गावातील शेतकरी तानाजी शांताराम बोडके यांनी आपल्या दहा गुंठे शेतीत असाच वेगळा प्रयोग करलन परिश्रमाला आधुनिकतेची जोड देऊन मिरचीच्या उत्पादनातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.  शेतकरी तानाजी बोडके यांनी अवघ्या १० गुंठे क्षेत्रात एका सिडस कंपनीचे प्रतिनिधी किरण मांडे यांच्या मार्गदर्शनाखाली एस्टॉन मिरचीची लागवड केली. ६ महिन्यांपूर्वी लागवड केलेल्या या मिरचीला ३० रूपये प्रतिकिलो या प्रमाणे बाजारभाव मिळून त्यांनी तब्बल एक लाख ६६ हजारांचे उत्पन्न घेतले. उत्पन्नात अजूनही वाढ होण्याची अपेक्षा आहे. जैविक औषधांची फवारणी केल्यामुळे मिरचीची लांबी आठ ते दहा सें.मी. अधिक वाढली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे मिरची पिकावर मोठे विपरीत परिणाम जाणवले असले तरी बोडके यांना अद्याप उत्पन्न मिळण्याची आशा आहे. अनेकांना मिरचीने रडवले असताना शेतीला माहिती तंत्रज्ञानाची जोड दिल्यास दहा गुंठ्यातील मिरचीही चांगले उत्पन्न मिळवून देऊ शकते हे यातून दिसते.  द्राक्ष काढणीचा हंगाम जोरात सुरू आहे. सोनाका, गणेश, थॉमसन व काळी अशा जातीची द्राक्षे परदेशात जात असतानाच वणी व परिसरातील फ्लेम जातीच्या फिकट तपकिरी लालसर रंगाच्या गोड द्राक्षांनी गुजराथी जनतेला भुरळ घातली आहे. वणी-सापुतारा मार्गे गुजरात राज्यात मार्गक्र मण करणारे गुजराथी बांधव रस्त्यालगतच्या द्राक्षबागांमधून वा रस्त्याच्या कडेला असलेल्या विक्रेत्यांकडून द्राक्ष खरेदी करताना दिसत आहे. सदरच्या द्राक्षांमध्ये तीन महिन्यांच्या कालावधीत पूर्णत: साखर उतरते म्हणजेच नैसर्गिक गोडी तयार होते. त्यामुळे स्वाभाविक प्लेम जातीच्या द्राक्षांना पसंती दिली जात आहे.
 

Web Title:  The yield of one and a half cubits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी