महिला कल्याण समिती जिल्हा दौ-यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 02:59 PM2017-11-10T14:59:35+5:302017-11-10T15:07:51+5:30

Women Welfare Committee on district tour | महिला कल्याण समिती जिल्हा दौ-यावर

महिला कल्याण समिती जिल्हा दौ-यावर

Next
ठळक मुद्दे२२ व २३ नोव्हेंबरला करणार दौराकल्याणकारी योजनांचा आढावा घेणार


नाशिक : महाराष्ट्र विधीमंडळाची महिला हक्क व कल्याण समिती नाशिक जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौºयावर येणार आहे. २२ व २३ नोव्हेंबर रोजी समिती जिल्ह्यात जिल्हा परिषद, महापालिका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या कल्याणकारी योजनांचा आढावा घेणार आहेत.
या समितीचय दौºयानिमित्ताने जिल्हा परिषदेत जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. समिती बुधवारी (दि.२२) जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, जिल्हा परिषदेचे मुलींचे वसतिगृह, तर शुक्र वारी (दि.२३) महापलिका व जिल्हा परिषदेच्या यांच्या सेवेतील महिला अधिकारी, कर्मचारी यांची भरती, आरक्षण व अनुशेष तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांंमधील महिलांसाठी राबविण्यात येणाºया विविध कल्याणकारी योजना यांचा आढावा घेणार आहे. यात प्रामुख्याने महापालिका, जिल्हा परिषद येथील महिला कर्मचाºयांची यादी, झालेली भरती, करण्यात आलेली बढती, महिला आरक्षण, अनुशेष यांचा आढावा समितीकडून घेतला जाणार आहे. याशिवाय जिल्हा बँकेत कार्यरत महिला, आरक्षण तसेच येथे राबवित असलेल्या योजना यांचादेखील आढावा समितीत घेतला जाईल. समितीच्या अनुषगांने विचारल्या जाणाºया प्रश्नांची नियमावली जिल्हा परिषदेस प्राप्त झाली असून, त्यानुसार तयारीला सामान्य प्रशासनासह सर्व विभागांकडून सुरुवात झाली आहे. त्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडून इतर विभागाकडून माहिती मिळविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Web Title: Women Welfare Committee on district tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.