‘पांढरी काठी’दिनी दिव्यांगांची यशोगाथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 11:30 PM2018-10-13T23:30:17+5:302018-10-13T23:31:11+5:30

जागतिक पांढरी काठी दिन (दि. १५) साजरा करण्यात येणार असून, या दिवशी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइन्डच्या महाराष्ट्र शाखेतर्फे सहा निवडक दिव्यांग व्यक्तींची यशोगाथा त्यांच्या प्रकट मुलाखतीद्वारे उलगडली जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी दिली.

'White kothi' day's success story | ‘पांढरी काठी’दिनी दिव्यांगांची यशोगाथा

‘पांढरी काठी’दिनी दिव्यांगांची यशोगाथा

googlenewsNext

नाशिक : जागतिक पांढरी काठी दिन (दि. १५) साजरा करण्यात येणार असून, या दिवशी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइन्डच्या महाराष्ट्र शाखेतर्फे सहा निवडक दिव्यांग व्यक्तींची यशोगाथा त्यांच्या प्रकट मुलाखतीद्वारे उलगडली जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी दिली.
यावेळी स्टेट बॅँकेच्या नाशिक शाखेत उपव्यवस्थापक असलेले वैभव पुराणिक यांच्यासह मुंबईच्या आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक नेहा पावसकर, कीर्तनकार तथा बँक आॅफ महाराष्ट्रचे अधिकारी पुंडलिक पिंपळके, नाशिकचे नायब तहसीलदार हंसराज पाटील, नागपूर येथे रिझर्व्ह बँकेतील सहायक व्यवस्थापक राजेश आसुदानी व मुंबईत सेबीचे व्यवस्थापक राहुल केलापूर यांची मुलाखत अमरावतीच्या प्रयास संस्थेचे प्रमुख डॉ. अविनाश सावजी घेणार असल्याचे कलंत्री यांनी सांगितले.

Web Title: 'White kothi' day's success story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.