उड्डाणपुलाखालील गुंता सुटणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 01:00 AM2018-07-15T01:00:36+5:302018-07-15T01:01:05+5:30

When will the fly under the flyover go on? | उड्डाणपुलाखालील गुंता सुटणार कधी?

उड्डाणपुलाखालील गुंता सुटणार कधी?

Next
ठळक मुद्देवडाळारोड कॉर्नर : चौफुली ओलांडताना अपघात; कोंडी नित्याचीच

नाशिक : अरुंद चौकात फळविक्रेत्यांची रस्त्यातच दुकानदारी, रिक्षांचा थांबा, वाहनांचा गराडा अन् बेशिस्त वाहतूक अशा विविध कारणांमुळे वडाळा रस्त्याच्या प्रारंभी उड्डाणपुलाखाली होणारा वाहतुकीचा गुंता सुटणार कधी? असा प्रश्न त्रस्त नागरिकांकडून विचारला जात आहे. वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे दररोज या चौकात लहान-मोठ्या अपघातांच्या घटना घडतात; मात्र याकडे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे दुर्लक्ष होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मुंबई महामार्गावरील द्वारका-मुंबई नाक्याकडून येणारी वाहतूक, वडाळा-पाथर्डी रस्त्यावरून ये-जा करणारी वाहने, दोन्ही समांतर रस्त्यावरील वर्दळीमुळे या चौकात दिवसभर वाहनांची कोंडी होते. प्रत्येक वाहनधारक एकमेकांचे वाहन चुकवून वाट काढण्याचा प्रयत्न करत असतो. यावेळी बेशिस्त रिक्षाचालक तसेच शहरात इतरत्र जाणारे वाहनचालक या चौकातून मार्ग बदलतात. मुंबईनाक्याकडून येणारी वाहने शालिमारकडे जाताना थेट चौकातून वळण घेत द्वारकेचा वळसा वाचवितात आणि वडाळानाकामार्गे सारडासर्कलकडे रवाना होतात. तसेच या चौकातच फळविक्रेते व्यवसाय उड्डाणपुलाच्या खांबांच्या आधारे हातगाडी लावून करत असल्याने फळे खरेदी करण्यासाठी दुचाकीस्वार रस्त्यात वाहने थांबवितात. यामुळे अपघाताच्या घटना येथे सातत्याने घडतात. अरुंद चौक असल्यामुळे वडाळा-पाथर्डी रस्त्याच्या प्रारंभी रिक्षाथांब्यापासून, तर संपूर्ण उड्डाणपुलाखाली वाहतुकीचा फज्जा उडालेला दिसतो. दोन्ही समांतर रस्त्यांवरील वाहतूक, महामार्गावरील वाहने आणि वडाळा रस्त्यावरून येणारी वाहतूक या चौकात समोरासमोर येऊन अपघाताच्या
सिग्नल केवळ शोभेपुरता
या चौकातील वाहतूक सुरक्षिततेसाठी व वाहनकोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने सिग्नल मंजूर करून त्याची उभारणी महापालिके च्या माध्यमातून करून घेतली आहे; मात्र हे सिग्नल अद्याप कार्यान्वित होण्याच्या प्रतीक्षेत असल्याने सध्या सिग्नल केवळ शोभेपुरताच ठरत आहे. सिग्नल कार्यान्वित झाल्यानंतर वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.घटनांना निमंत्रण मिळते.

Web Title: When will the fly under the flyover go on?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.