तळेगाव रोहीत दत्तू भोकनळचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 01:40 AM2018-09-04T01:40:41+5:302018-09-04T01:41:23+5:30

तालुक्यातील तळेगाव रोही येथील भूमिपुत्र व रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा लष्करातील जवान दत्तू बबन भोकनळ संघाने सांघिक सुवर्णपदक मिळविल्याबद्दल त्याचे सोमवारी जन्मगावी जंगी स्वागत करण्यात आले.

 Welcome to Talegaon Rhee Dattu Bhokanal | तळेगाव रोहीत दत्तू भोकनळचे स्वागत

तळेगाव रोहीत दत्तू भोकनळचे स्वागत

googlenewsNext

चांदवड : तालुक्यातील तळेगाव रोही येथील भूमिपुत्र व रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा लष्करातील जवान दत्तू बबन भोकनळ संघाने सांघिक सुवर्णपदक मिळविल्याबद्दल त्याचे सोमवारी जन्मगावी जंगी स्वागत करण्यात आले.  सकाळी १० वाजेच्या सुमारास त्यांचे आगमन होताच फटाक्याची आतषबाजी, तर पार्थ अ‍ॅकडमीच्या वतीने तळेगावरोही व परिसरात उघडया जीपवरुन भोकनळची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर तळेगावरोही येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या प्रांगणात सत्कार समारंभ पा पडला. अध्यक्षस्थानी राधाजी पाटील भोकनळ होते तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार डॉ.राहुल अहेर, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, संजय पवार,अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, पंचायत समितीचे सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, उपसभापती अमोल भालेराव, बाजार समितीचे उपसभापती नितीन अहेर, अशोक भोसले, बाळासाहेब वाघ, सुनील शेलार, जिल्हा परिषद सदस्य डॉ.सयाजीराव गायकवाड, अरुण न्याहारकर, वर्धमान पांडे, अनिल काळे, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, विलास ढोमसे, शहाजी भोकनळ, देवीदास अहेर, विश्वासराव देवरे,निवृत्ती घुले, सरपंच साधना पाटील,अनिल पाटील आदिसह मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दत्तु भोकनळ यांचा सत्कार करण्यात आला. प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन, स्वागतगीत विद्यालयातील संगीत चमुने सादर केले तर प्रास्तविक दीपक काळे यांनी केले. शिवाजीराव पाटील यांनी अनेक किस्से सांगत त्यास आर्थिक मदत करावी असे आवाहन केले. यावेळी पार्थ अ‍ॅकडमीच्या विद्यार्थ्यांनी गीत व नृत्यात दत्तूची गाथा सादर केली . तिरंगी ध्वजाच्या रंगाचे पोशाख परिधान करुन विद्यार्थ्यांनी मनोरा रचला तसेच लाठी काठीचे प्रदर्शनही केले.  सत्काराला उत्तर देतांना दत्तू भोकनळ याने भविष्यात भारताचे नाव येत्या आॅलिम्पिकमध्ये पुढे नेणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त केला. या समारंभास तालुक्यातील नागरीक उपस्थित होते.
सेवा-सवलतीसाठी पाठपुरावा करू : चव्हाण
च्खासदार चव्हाण यांनी तळेगावरोही सारख्या दुष्काळी भागात पाणी नसतांना दत्तुने भारताचे नाव पाण्याशी संलग्न खेळातुन मिळविले. याचा सार्थ अभिमान असून मुख्यमंत्री फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दत्तूच्या मानधन व सेवा सवलतीसाठी पाठपुरावा करु असे आश्वासन दिले. माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी दत्तूने आॅलिम्पिकमध्ये देशाचे नाव उंचवावे यासाठी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले. तर नाईक यांनी दत्तूला शासकीय नोकरी तसेच दहा लाखाचे बक्षिस देणार असल्याचे सांगीतले. आमदार अहेर यांनीही दत्तूच्या यशाबद्दल कौतुक केले.

Web Title:  Welcome to Talegaon Rhee Dattu Bhokanal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक