खर्डे परिसरात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 05:44 PM2019-05-11T17:44:50+5:302019-05-11T17:45:04+5:30

खर्डे : देवळा तालुक्यातील खर्डे येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून , खर्डे येथे चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने पाणी टंचाईने ग्रामस्थ हैराण झाले आहेत .

Water shortage in Kharde area | खर्डे परिसरात पाणीटंचाई

खर्डे परिसरात पाणीटंचाई

Next

खर्डे : देवळा तालुक्यातील खर्डे येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून , खर्डे येथे चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने पाणी टंचाईने ग्रामस्थ हैराण झाले आहेत . पाणी नसल्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण योजनेंतर्गत करण्यात येणार्या प्रसूतीसाठी मोठी समस्या निर्माण झाल्याने ग्रामपंचायतीने दवाखान्यात पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी येथील वैधकीय अधिकारी व कर्मचारी वर्गाने केली आहे . खर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राची कायाकल्प अंतर्गत राज्यस्तरीय निवड कारण्यात आली असून , ५० हजार रु पयांचे बक्षीस मिळाले आहे . पाण्याअभावी प्रसूती करणे अशक्य असल्याने ग्रामपंचायतीने दवाखान्यात त्वरित पाणी उपलब्ध करून द्यावे ,अशी मागणी वैधकीय अधीकारी डॉ . सौ . सपकाळे यांनी केली आहे . खर्डे ग्रामपंचायतीची सार्वजनिक पाणी पुरवठा करणारी विहीर ही लगतच्या वार्शी धरणाच्या पायथ्याशी आहे . मात्र या धरणात फक्त मृत साठा शिल्लक असल्याने या विहिरीने तळ गाठला असून , येथील जवळच असलेल्या मुलूखवाडी येथील शेतकर्याची विहीर ग्रामपंचायतीने अधिग्रहित केली असून , याद्वारे सध्या खर्डे गावाला पाणीपुरवठा सुरु आहे .

Web Title: Water shortage in Kharde area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी