स्नेहमेळाव्यात विविध गुणदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 12:35 AM2019-02-18T00:35:48+5:302019-02-18T00:39:27+5:30

वानिफाड : येथील श्री माणकेश्वर वाचनालयाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त वाचनालयाच्या वतीने महिला स्नेहमेळावा संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी निफाड नगरपंचायतच्या उपनगराध्यक्ष स्वाती गाजरे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक सुनीता कुंदे, नयना निकाळे, चारुशीला कर्डिले आदी होत्या. प्रास्ताविक मालती वाघवकर यांनी केले

Various monuments in Snehamela | स्नेहमेळाव्यात विविध गुणदर्शन

माणकेश्वर वाचनालयाच्या वतीने आयोजित विविध विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकासोबत स्वाती गाजरे, सुनिता कुंदे, नयना निकाळे, चारूशीला कर्डीले, मालती वाघवकर, मेघा जंगम, सुजाता तनपुरे आदी

Next
ठळक मुद्देनिफाड : माणकेश्वर वाचनालयात महिला स्नेहमेळा

निफाड : येथील श्री माणकेश्वर वाचनालयाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त वाचनालयाच्या वतीने महिला स्नेहमेळावा संपन्न झाला.
याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी निफाड नगरपंचायतच्या उपनगराध्यक्ष स्वाती गाजरे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक सुनीता कुंदे, नयना निकाळे, चारुशीला कर्डिले आदी होत्या. प्रास्ताविक मालती वाघवकर यांनी केले
या मेळाव्यात महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. मला काही सांगायचंय, रिंग द बेल, थ्रो द रिंग, फॅन्सी ड्रेस या स्पर्धांचा यामध्ये समावेश होतो. महिलांच्या मला काही सांगायचं या स्पर्धेत स्पर्धकांनी आपल्या आविष्कारांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. तसेच मी सावित्री, मी तिरंगा, मी नृत्यांगणा, मी आनंदी या वेशभूषा स्पर्धकांनी साकारल्या होत्या
या स्पर्धेच्या निकाल पुढील प्रमाणे-फॅन्सी ड्रेस स्पर्धा- प्रथम क्रमांक - रंजना लाहोटी व दीपाली सुरळीकर, द्वितीय क्र मांक- डॉ. सीमा डेर्ले, सुषमा कराड व दीपाली दाभाडे, मला काही सांगायचं स्पर्धा-प्रथम क्रमांक- मीनाक्षी पवार, द्वितीय क्रमांक, दीपाली अहेर, तृतीय क्र मांक-प्रतिभा शिरसाठ, थ्रो द रिंग स्पर्धा-प्रथम क्रमांक- शीतल चोरिडया, द्वितीय क्रमांक, जानकी ठाकरे, तृतीय क्रमांक-मीनाक्षी पवार, रिंग द बेल स्पर्धा-प्रथम क्रमांक कविता शिंदे, द्वितीय क्रमांक-चित्रा ढमे, तृतीय क्रमांक-पूनम नाकाडे. या सर्व विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
सूत्रसंचालन मेघा जगंम, तर आभार उपाध्यक्ष सुजाता तनपुरे यांनी केले. याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष दत्ता उगावकर, माजी अध्यक्ष मधुकर शेलार, अश्विनी बर्वे, सुवर्णा चाफेकर, जयश्री जाधव, वैशाली सोनवणे, भारती पाठक, वंदना बोरसे आदी उपस्थित होत्या.

Web Title: Various monuments in Snehamela

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक