Two-wheeler injured in leopard attack | बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी

सिन्नर : दुचाकीवरुन दूध घेवून जाणाºया युवकावर बिबट्याने हल्ला केल्याने तो जखमी झाल्याची घटना रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. नळवाडी-डोंगरगाव रस्त्यावर झालेल्या या घटनेत जखमी झालेल्या युवकाला उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे. संजय उत्तम सहाणे (३५) हा युवक दुचाकीहून दूध घेवून जात असतांना बिबट्याने हल्ला केला. पायाला पंजा लागून सहाणे जखमी झाला. प्रसंगावधान राखत दुचाकी खाली पडून न देता सहाणे याने बिबट्याच्या तावडीतून सुटका करुन घेतली.