दोन भावंडांचा तलावात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 10:41 PM2017-09-17T22:41:51+5:302017-09-18T00:08:13+5:30

घोटी शहरातील महिला आपल्या दोन मुलांसह घराजवळील वनविभागाच्या तलावात कपडे धुण्यासाठी गेली असता एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात दोघा सख्ख्या भावंडांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. याबाबत घोटी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, या घटनेमुळे घोटी शहरात व्यक्त करण्यात येत आहे.

Two siblings drown in a lake and die | दोन भावंडांचा तलावात बुडून मृत्यू

दोन भावंडांचा तलावात बुडून मृत्यू

Next

घोटी : घोटी शहरातील महिला आपल्या दोन मुलांसह घराजवळील वनविभागाच्या तलावात कपडे धुण्यासाठी गेली असता एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात दोघा सख्ख्या भावंडांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. याबाबत घोटी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, या घटनेमुळे घोटी शहरात व्यक्त करण्यात येत आहे.
घोटी शहरातील आरोटेनगर विभागात राहणारी ज्योती जगदीश लहामगे ही महिला आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घरालगत असणाºया वनविभागाच्या तलावात कपडे धुण्यासाठी गेली होती. तिची नेहा जगदीश लहामगे (वय १४) व साहिल जगदीश लहामगे (वय १०) ही दोन्ही मुले कपडे धुण्यासाठी आपल्या आईला मदत करीत असताना या दोन्ही मुलांचा पाय घसरल्याने खोल पाण्यात बुडाली. दरम्यान, यावेळी ज्योती लहामगे यांनी आरडाओरड केल्याने तिचा भाऊ शिवाजी चोथे यांनी धाव घेऊन स्थानिक युवकाच्या मदतीने या दोन्ही मुलांना बाहेर काढण्यात यश मिळविले; मात्र ही दोन्ही मुले मृत अवस्थेत मिळून आली.
दरम्यान, याबाबतची कल्पना संजय आरोटे यांनी घोटी पोलिसांना दिल्यानंतर सहाययक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, उपनिरीक्षक आनंद माळी, संदीप शिंदे, नितीन भालेराव, सुहास गोसावी आदींच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. या दोन्ही मृतदेहांचे घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात आणून शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमुळे घोटी शहरात दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी ग्रामस्थांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. घोटी परिसरात असलेल्या वनविभागाच्या या तलावात दोन भावंडांचा बुडून मृत्यू झाला

Web Title: Two siblings drown in a lake and die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.