दोघा नाशिककर सायकलीस्ट्सने पूर्ण केली डेथ रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 06:55 PM2018-09-03T18:55:39+5:302018-09-03T18:56:54+5:30

Two Nashikar cyclists completed their death race | दोघा नाशिककर सायकलीस्ट्सने पूर्ण केली डेथ रेस

दोघा नाशिककर सायकलीस्ट्सने पूर्ण केली डेथ रेस

Next

नाशिक : नाशिककर सायकलीस्ट्स किशोर काळे, संगमनेरचे विजय काळे यांनी जगातील अवघड स्पर्धांपैकी एक समजली जाणारी तथा डेथ रेस असे टोपण नाव मिळालेली भूतान - टूर आॅफ द ड्रॅगन ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली आहे. एकाच वर्षात चार भारतीय सायकलीस्टसने स्पर्धा पूर्ण करण्याची ही पहलीच वेळ आहे. उत्तराखंड मधील दोघांनीही ही रेस पूर्ण करण्यात यश मिळवले आहे.
1 सप्टेंबर रोजी झालेल्या टूर आॅफ ड्रॅगनच्या नवव्या आवृत्तीत जगभरातून एकूण 35 सायकलीस्ट्सने सहभाग नोंदवला. किशोर काळे यांनी 17 तासात तर विजय काळे यांनी 18 तासात ही स्पर्धा पूर्ण केली. यावेळी स्पर्धा पूर्ण करणार्या दोघा सायकलीस्ट्सचा सत्कार भूतान आॅलिम्पिक कमिटीचे चेअरमन यांच्या हस्ते करण्यात येतो.
सायकलिंगचे कॅपिटल होऊ बघणार्या नाशिक शहरातील चार सायकलीस्ट्सने ही स्पर्धा पूर्ण केली आहे हे विशेष. या आधी 2012 मध्ये डॉ. महेंद्र महाजन तर गेल्या वर्षी 2017 मध्ये डॉ. हितेंद्र महाजन यांनी ही स्पर्धा पूर्ण केली आहे. तर आता 2018 मध्ये किशोर काळे ,विजय काळे यांनी ही किमया साधली आहे.हिमालयाचे विहंगम दृश्यांची अनुभूती अनुभवण्याची संधी स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर मिळते. एकूण चार घाट चढून उतरायचे असतात. त्यातील शेवटचा घाट सलग 40 किमीच्या चढायचा असल्याचे शेवटपर्यंत स्पर्धेतील आव्हान जिवंत असते. त्यामुळे सहकार्यांचा तगडा पाठिंबा असल्याशिवाय हे शक्य नव्हते. 

Web Title: Two Nashikar cyclists completed their death race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक