मालेगाव शहराला आता दोन दिवसाआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 01:32 AM2018-12-06T01:32:35+5:302018-12-06T01:32:55+5:30

मालेगाव : तालुक्यातील दुष्काळी स्थिती, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा व चणकापूर धरणातील जलसाठ्याचा विचार करून व गेल्यावर्षीच्या तुलनेत पाण्याची वाढलेली मागणी लक्षात घेता महापालिका प्रशासनाने शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या आठवडाभरात पाणीपुरवठा वेळापत्रकाचे नियोजन केले जाणार आहे. शहरवासीयांवर पाणी कपातीचे संकट ओढावले आहे.

 Two days back water supply to Malegaon city | मालेगाव शहराला आता दोन दिवसाआड पाणीपुरवठा

मालेगाव शहराला आता दोन दिवसाआड पाणीपुरवठा

googlenewsNext
ठळक मुद्दे तळवाडे साठवण तलावात आवर्तन सोडल्यामुळे पाणी उपलब्ध आहे.

मालेगाव : तालुक्यातील दुष्काळी स्थिती, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा व चणकापूर धरणातील जलसाठ्याचा विचार करून व गेल्यावर्षीच्या तुलनेत पाण्याची वाढलेली मागणी लक्षात घेता महापालिका प्रशासनाने शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या आठवडाभरात पाणीपुरवठा वेळापत्रकाचे नियोजन केले जाणार आहे. शहरवासीयांवर पाणी कपातीचे संकट ओढावले आहे.
भविष्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी महापालिकेने पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सद्यस्थितीत एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. चणकापूर धरणातून अजून तीन पाण्याचे आवर्तन येणार आहेत. ३५० दलघफू पाणी एका आवर्तनातून सोडले जाते. तळवाडे साठवण तलावाची ८७ दलघफू क्षमता आहे. एका आवर्तनाद्वारे ९० दलघफू पाणी तळवाडे साठवण तलावात उपलब्ध होत असते. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांची बैठक झाली आहे.
याबैठकीत दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.शहराला गिरणा व चणकापूर धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. चणकापूर धरणातून १४००, तर गिरणा धरणातून ६०० दलघफू पाणी आरक्षित करण्यात आले आहे. गिरणा धरणात महापालिकेचा ३६ टक्के जलसाठा शिल्लक आहे, तर तळवाडे साठवण तलावात आवर्तन सोडल्यामुळे पाणी उपलब्ध आहे.

Web Title:  Two days back water supply to Malegaon city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.