एटीएममधून पंचवीस हजारांची रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 12:51 AM2018-12-30T00:51:07+5:302018-12-30T00:51:23+5:30

एटीएममधून पैसे न आल्याने गुगल मॅपवरून बँकेच्या आयकॉनवर असलेल्या नंबरवर चौकशी केली असता संबंधित संशयिताने एटीएम कार्डचा नंबर व आयडी मागून खात्यातून परस्पर २५ हजार रुपये काढून घेतल्याची घटना अशोकस्तंभ परिसरात घडली़

 Twenty-five thousand cash withdrawal from ATM | एटीएममधून पंचवीस हजारांची रोकड लंपास

एटीएममधून पंचवीस हजारांची रोकड लंपास

googlenewsNext

नाशिक : एटीएममधून पैसे न आल्याने गुगल मॅपवरून बँकेच्या आयकॉनवर असलेल्या नंबरवर चौकशी केली असता संबंधित संशयिताने एटीएम कार्डचा नंबर व आयडी मागून खात्यातून परस्पर २५ हजार रुपये काढून घेतल्याची घटना अशोकस्तंभ परिसरात घडली़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशोकनगर येथील कल्पतरूनगरमध्ये दीपक दत्तात्रय निकम (४६, साईस्मित रो-हाउस) राहतात. मंगळवारी (दि. २५) दुपारी ते अशोकस्तंभावरील सिंडीकेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते; मात्र येथील एटीएम मशीनमधून पैसे न आल्याने त्यांनी गोळे कॉलनीतील एलआयसी आॅफिस परिसरात गेल्यावर गुगल मॅपच्या सहाय्याने सिंडीकेट बँकेच्या आयकॉनवर असलेल्या ९७४८३२८०५२ या मोबाइल क्रमांकावर चौकशी करण्यासाठी फोन केला़ यावेळी समोरून संशयिताने निकम यांच्या एटीएम कार्डचा नंबर व बॅच आयडी मागितला़ यानंतर संशयिताने निकम यांच्या अशोकामार्ग येथील सिंडीकेट बँकेच्या खात्यातून पंचवीस हजार रुपये परस्पर काढून घेतले़ या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी अज्ञात संशयिताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़

Web Title:  Twenty-five thousand cash withdrawal from ATM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.