कंटेनरला ट्रकची धडक ; अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 04:48 PM2019-02-13T16:48:17+5:302019-02-13T16:48:33+5:30

इगतपुरी : मुंबई आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटात ब्रेक फेल कंटेनरला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने कंटेनरमधील ड्रायव्हर व क्लिनर जागीच ठार झाले.

 Truck hits the container; Two killed in accident | कंटेनरला ट्रकची धडक ; अपघातात दोन ठार

कंटेनरला ट्रकची धडक ; अपघातात दोन ठार

googlenewsNext

इगतपुरी : मुंबई आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटात ब्रेक फेल कंटेनरला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने कंटेनरमधील ड्रायव्हर व क्लिनर जागीच ठार झाले. इगतपुरी जवळील मुंबई आग्रा महामार्गावरील नवीन
कसारा घाटात नाशिकहुन मुंबईकडे उताराच्या दिशेने माल वाहु कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने हा कंटेनर ( क्र मांक एम. एच. ४६ बी. एफ. ३१४६ ) उतार असल्याने हळू हळू घाट उतरत होता. अचानक मागुन येणाºया भरगाव ट्रकने ( क्र मांक एम. एच. १९ झेड. ६०६७ ) घाट उतरत असलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिल्याने कंटेनरमधील ड्रायव्हर व क्लिनर खाली पडुन त्यांच्या अंगावरून कंटेनर गेल्याने ते जागीच ठार झाले. या अपघाताची माहिती समजताच मुंबई नाशिक एक्सप्रेस रूटचे पेट्रोलिंग आॅफिसर रवी देहाडे, मुजाहिद शेख, विक्र ांत खाजेकर, नारायण वळकंदे व महामार्ग सुरक्षा पोलीस यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन रु ग्णवाहिका प्राचारण करु न मृतांना इगतपुरी ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले. अपघाताबाबत कसारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title:  Truck hits the container; Two killed in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक