त्र्यंबककरांना लागले आता निवृत्तिनाथ महाराज यात्रेचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 11:04 PM2019-01-13T23:04:43+5:302019-01-14T00:48:43+5:30

त्र्यंबकेश्वर येथील खंडेराव महाराजांचा बांगरषष्ठी यात्रोत्सव संपन्न झाल्यानंतर त्र्यंबककरांना वेध लागतात ते संत श्री निवृत्तिनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाचे.

Trimbakkar started to watch Nivittinath Maharaj Yatra | त्र्यंबककरांना लागले आता निवृत्तिनाथ महाराज यात्रेचे वेध

त्र्यंबककरांना लागले आता निवृत्तिनाथ महाराज यात्रेचे वेध

Next
ठळक मुद्देबैठक : नगरपालिकेकडून यात्रोत्सवाच्या पूर्वतयारीला प्रारंभ

त्र्यंबकेश्वर : येथील खंडेराव महाराजांचा बांगरषष्ठी यात्रोत्सव संपन्न झाल्यानंतर त्र्यंबककरांना वेध लागतात ते संत श्री निवृत्तिनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाचे.
पौष वद्य षट्तिला एकादशी या मुहूर्तावर निवृत्तिनाथांची यात्रा भरते. चार दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवात मंदिर ट्रस्टतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. निवृत्तिनाथांचा पौष एकादशीचा यात्रोत्सव यंदा ३१ जानेवारी रोजी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या आठ-दहा दिवसांत प्रांताधिकारी यांची यात्रा नियोजनासंबंधी बैठक होईल. त्यानंतर पोलीस बंदोबस्त नियोजन बैठक व त्यानंतर नगर परिषदेची नियोजन बैठक होईल. यात्रोत्सवानिमित्त अनेक व्यावसायिक आपली दुकाने थाटतात. यात पूजा साहित्य, प्रसाद, खाद्यपदार्थ तसेच खेळण्यांच्या दुकांनाचा समावेश असतो. ज्या लोकांचे नेहमीचे व्यवसाय नाहीत असे लोकही यात्रोत्सवात दुकाने थाटतात.
नगरपालिका यात्रोत्सवाच्या पूर्वतयारीला लागली आहे. आरोग्य विभागाचे साहित्य, पथदीप उभारण्यासाठी लागणारे विद्युत साहित्य आदींची खरेदी करण्यासाठी पालिकेने निविदा काढण्यास सुरु वात केली आहे.
षट्तिला एकादशी यात्रोत्सवाला त्र्यंबकमध्ये वैष्णवांचा मेळाच भरलेला असतो. वारकरी निवृत्तिरायांना भेटण्यासाठी जीवघेण्या थंडीची, दुपारच्या उन्हाची पर्वा न करता त्र्यंबकेश्वरची वाट तुडवत नाम संकीर्तन करीत त्र्यंबकनगरीत दाखल होतो.
वारकरी नाचण्यात दंग
मैलोन्मैल अंतर पायी पार करत आलेला प्रत्येक वारकरी निवृत्तिनाथांपुढे नाचण्यात दंग झालेला असतो. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज ज्ञानेश्वरांचे गुरु आहेत. त्यामुळे आळंदी येथून ज्ञानेश्वरांची, सासवड येथून सोपानकाकांची, मुक्ताईनगरहून मुक्ताईची पालखी त्र्यंबकमध्ये दाखल होते. महाराष्ट्रातील विविध भागांतून वारकºयांच्या दिंड्याही त्र्यंबकनगरीत दाखल होतात.

त्र्यंबककरांना लागले आता निवृत्तिनाथ महाराज यात्रेचे वेध
बैठक : नगरपालिकेकडून यात्रोत्सवाच्या पूर्वतयारीला प्रारंभ

Web Title: Trimbakkar started to watch Nivittinath Maharaj Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.