त्र्यंबकेश्वरी भाविकांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 10:21 PM2018-02-13T22:21:24+5:302018-02-13T22:24:04+5:30

त्र्यंबकेश्वर : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी भाविकांनी महाशिवरात्रीनिमित्त मोठी गर्दी केली आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच पूजा, पालखी, दर्शन सोहळ्याने व ओम नम: शिवाय, हर हर महादेवच्या जयघोषाने त्र्यंबकनगरी दुमदुमली आहे.

Trimbakeshwari temple of Mandiyaali | त्र्यंबकेश्वरी भाविकांची मांदियाळी

त्र्यंबकेश्वरी भाविकांची मांदियाळी

Next
ठळक मुद्देमहाशिवरात्र : बम बम भोले, ओम नम: शिवायच्या जयघोषाने दुमदुमली त्र्यंबकनगरीमहाशिवरात्रीनिमित्त मोठी गर्दी

त्र्यंबकेश्वर : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी भाविकांनी महाशिवरात्रीनिमित्त मोठी गर्दी केली आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच पूजा, पालखी, दर्शन सोहळ्याने व ओम नम: शिवाय, हर हर महादेवच्या जयघोषाने त्र्यंबकनगरी दुमदुमली आहे.
महाशिवरात्रीनिमित्त राज्याच्या विविध भागासह गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आदी ठिकाणांहून मोठ्या संख्येने भाविक आले आहेत. ज्या ज्या ठिकाणी भगवान शंकराची स्थाने आहेत तेथे महाशिवरात्रीला यात्रा भरते. भाविकतेथेच दर्शन घेऊन समाधान मानतो. घोटीजवळील सर्वतीर्थ टाकेद, नाशिकला सोमेश्वर, कपालेश्वर, हरसूलजवळील दावलेश्वर आदी शंकराची जागृत स्थाने आहेत. सिन्नर, कळवण, चांदवड आदी तालुक्यातील महादेवाची प्रसिद्ध मंदिरे आहेत. या ठिकाणीदेखील यात्रा असल्याने महाशिवरात्री यात्रा विभागून जाते. या प्रत्येक ठिकाणी गर्दी असते. त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग असल्याने येथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात.
भगवान त्र्यंबकेश्वराचे वर्षभरात फक्त तीनच सण उत्सव असतात. त्यातील महाशिवरात्री संपूर्ण श्रावणमास. त्यातील तिसरा श्रावण सोमवार व त्रिपुरारी पौर्णिमेचा रथोत्सव, तर तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वरला पौष वद्य एकादशीला संत निवृत्तिनाथ महाराज यांची सतत तीन दिवस सर्वात मोठी यात्रा भरते. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे महाशिवरात्री, त्रिपुरारी रथोत्सव व तिसरा श्रावण सोमवार हे उत्सव साजरे केले जातात.
आज महाशिवरात्री असल्याने कमीत कमी एक लाख भाविक येतील, असा अंदाज प्रशासनाने गृहीत धरला होता. मात्र प्रशासनाचा अंदाज चुकला. तेवढीच गर्दी होऊ शकली नाही. कारण महाशिवरात्रीची गर्दी विभागली जाते. दरम्यान, दुपारी ३ वाजता भगवान त्र्यंबकेश्वराची पालखी निघून कुशावर्तावर स्नानासाठी देवस्थानचे पारंपरिक वाजंत्री बॅण्डपथक आदी वाद्यांच्या गजरात नेण्यात आली होती. पालखीसमवेत हजारो भाविक भक्तजन उपस्थित होते. रात्री रवींद्र अग्निहोत्री यांचे कीर्तन झाले, तर रविवार आणि सोमवार बाळासाहेब तथा महेंद्र चांदवडकर यांचे कीर्तन होते. या दोघांनीही भाविक व श्रोत्यांना आपल्या ओघवत्या शैलीने मंत्रमुग्ध केले होते. ही सर्व व्यवस्था देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एम.एस. बोधनकर, अ‍ॅड. श्रीकांत गायधनी, कैलास घुले, सत्यप्रिय शुक्ल आदींसह सर्व विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी समीर वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी राजाभाऊ जोशी, सुरक्षा अधिकारी अमित टोकेकर, जनसंपर्क अधिकारी रश्मी जाधव आदींनी अत्यंत चोखपणे आपल्या कर्मचाºयांसमवेत पार पाडली.
आज महाशिवरात्री उपवास असल्याने खजूर, साबुदाणा खिचडी, थालीपीठ, बटाटे वेफर्स आदींना मागणी होती. महाशिवरात्रीनिमित्त शंकराला प्रिय असणारे कवठ, बिल्व फळ व तीन पानी बिल्व पत्र व उसाच्या रसाला विशेष मागणी होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गर्दी कमी असल्याचे काही व्यावसायिकांनी सांगितले.कुशावर्तावर गर्दीमहाशिवरात्रीनिमित्त पवित्र तीर्थराज कुशावर्तावर भाविकांनी स्नानासाठी गर्दी केली होती. दरम्यान, होणारी गर्दी लक्षात घेता नियोजन व सुलभतेच्या दृष्टीने व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे शासकीय लेखी प्रोटोकॉल-व्यतिरिक्त अन्य सर्व शासकीय-निमशासकीय संस्थांचे अधिकारी, राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर आदींना व्हीआयपी दर्शनास बंदी घालण्यात आली. भाविकांची गर्दी लक्षात घेता येथे कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुमारे २५० अधिकाºयांनी गर्दीसाठी नियोजन केले होते. एसटी महामंडळातर्फे जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. आज २४ तास मंदीर खुले ठेवण्यात आले होते. भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती.त्र्यंबकराजाची सवाद्य पालखी मिरवणूक
महाशिवरात्रीनिमित्त महामृत्युंजय भगवान त्र्यंबकराजाची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. दुपारी पावणेतीन वाजता पालखी मंदिरातून निघाली. पालखीच्या पुढे देवस्थान पारंपरिक वाजंत्री त्र्यंबकेश्वर येथील विलास मोरे यांचा डीजे बॅण्ड पथक आणि एक वाद्य पथक अशा थाटात मिरवणूक निघाली होती. लक्ष्मीनारायण चौकापासून डावीकडे पाचआळीतून देवस्थानचे भूतपूर्व सोल ट्रस्टी जोगळेकर यांच्या निवासस्थान, कुशावर्ताच्या मागील बाजूने कुशावर्तावर पालखी आणण्यात आली. तेथे स्नान पूजा झाल्यानंतर पुन्हा पालखी मंदिरात आणली. पालखीसमवेत हजारो भाविक भक्त सामील झाले होते.

Web Title: Trimbakeshwari temple of Mandiyaali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक