प्राथमिक शाळेच्या वतीने वृक्ष दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 07:18 PM2019-07-13T19:18:00+5:302019-07-13T19:25:17+5:30

ब्राह्मणगाव : येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी पारंपारीक ड्रेस परिधान करून डोक्यावर तुळस, तसेच अनेक प्रकारातील वृक्षांची रोपे घेऊन गावातून घोषणा देत वृक्ष दिंडी काढली. द्वादशी दिनाचे महत्व साधत बालगोपाळांची दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

Tree dindi on behalf of primary school | प्राथमिक शाळेच्या वतीने वृक्ष दिंडी

प्राथमिक शाळेतर्फे आयोजित वृक्षदिंडीत सहभागी विद्यार्थी व ज्येष्ठ नेते यशवंत अहिरे व मुख्याध्यापक सुनील निकम व व शिक्षक.

Next
ठळक मुद्देब्राह्मणगाव : पावसासाठी केली विद्यार्थ्यांनी प्रार्थना

ब्राह्मणगाव : येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी पारंपारीक ड्रेस परिधान करून डोक्यावर तुळस, तसेच अनेक प्रकारातील वृक्षांची रोपे घेऊन गावातून घोषणा देत वृक्ष दिंडी काढली. द्वादशी दिनाचे महत्व साधत बालगोपाळांची दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेच्या प्रवेशद्वारापासून संपूर्ण गावात दिंडी काढत झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश देत वृक्षारोपणासाठी वातावरण निर्मिती करण्यात आली. त्यानंतर शाळेतील आदर्श शिक्षक पुष्पांजली कापडणीस यांचा विशेष यश संपादन केल्या बद्दल निमित्त सत्कार करण्यात आला.
सदरील कार्यक्र मास यशवंत अहिरे, सरपंच सरला अहिरे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य विनोद अहिरे, गोविंद अहिरे, गुलाब खरे, दगा अहिरे तसेच मुख्याध्यापक सुनील निकम व सर्व सहशिक्षक उपस्थित होते.
 

Web Title: Tree dindi on behalf of primary school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा