ट्रान्सफार्मर नादुरूस्त, दाद मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या वाहनाला अपघात, सात जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 01:16 PM2018-08-17T13:16:13+5:302018-08-17T13:16:28+5:30

जायखेडा : येथील वडपाटी शिवारातील ट्रान्सफार्मर गेल्या दोन महिन्यांपासून नादुरु स्त असून तो बदलून मिळत नसल्याने आपली व्यथा वरिष्ठ अधिकाºयांकडे मांडण्यासाठी सटाणा येथे गेलेल्या शेतकºयांच्या रिक्षाचा अपघात झाल्याने सात जणांसह रिक्षा चालक जखमी झाला आहे. तर रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.

Transformer Nadurast, injured in the accident of farmers who went to ask for help, seven injured | ट्रान्सफार्मर नादुरूस्त, दाद मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या वाहनाला अपघात, सात जखमी

ट्रान्सफार्मर नादुरूस्त, दाद मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या वाहनाला अपघात, सात जखमी

Next

जायखेडा : येथील वडपाटी शिवारातील ट्रान्सफार्मर गेल्या दोन महिन्यांपासून नादुरु स्त असून तो बदलून मिळत नसल्याने आपली व्यथा वरिष्ठ अधिकाºयांकडे मांडण्यासाठी सटाणा येथे गेलेल्या शेतकºयांच्या रिक्षाचा अपघात झाल्याने सात जणांसह रिक्षा चालक जखमी झाला आहे. तर रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. घटनेनंतर शेतकरी वर्गाकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. ब्राम्हणपाडे जायखेडा रस्त्या दरम्यानच्या सिध्देश्वर मंदिराजवळील वडपाटी शिवारातील ट्रान्सफार्मर गेल्या दोन महिन्यांपासून नादुरूस्त झाला आहे. हा ट्रान्सफार्मर बदलून मिळावा यासाठी शेतकरी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात चकरा मारून हतबल झाले आहेत. शेतकºयांना संबंधित अधिकाºयाकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षभरात हा ट्रान्सफार्मर चार ते पाच वेळा खराब झाल्याने शेतकरी वैतागले आहेत. वारंवार असला प्रकार होत असल्याने वीज कंपनीच्या कार्यशैलीवर नापसंती व्यक्त होत आहे. तर शेतकºयांना विजे अभावी नुकसान व त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक पातळीवर पाठपुरावा करु नही दाद मिळत नसल्याने परिसरातील आठ ते दहा शेतकरी प्रवाशी रिक्षा घेऊन सटाणा येथे वीज कंपनीच्या विरष्ट अधिकार्याकडे आपली व्यथा मांडण्यासाठी व तत्काळ ट्रान्सफार्मर मिळावा या मागणीसाठी गेले होते. यावेळी सटाणा ताहराबाद रस्त्यावरील आव्हाटी फाट्याजवळ अज्ञात ट्रकने या रिक्षास पाठीमागून धडक दिल्याने रिक्षा रस्ता कडेच्या खोल खड्यात फेकली गेली. यात पुंडलिक शेवाळे, शिवाजी शेवाळे, दयाराम अहिरे, पंडित शेवाळे, सुदाम शेवाळे, गौरव शेवाळे हे जखमी झाले तर अन्य शेतकºयांना मुकामार लागला. रिक्षा चालक भगवान जगताप जखमी झाला असून, त्याच्यावर मालेगाव येथे उपचार चालू आहेत.

Web Title: Transformer Nadurast, injured in the accident of farmers who went to ask for help, seven injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक