टमाटा २ रूपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 03:17 PM2018-03-24T15:17:53+5:302018-03-24T15:17:53+5:30

४० रूपये जाळी,  बॉर्डर बंदमुळे परदेशात निर्यात बंद,शेतकरी चिंतातूर

Tomato 2 kg kg | टमाटा २ रूपये किलो

टमाटा २ रूपये किलो

Next
ठळक मुद्दे४० रूपये जाळी  बॉर्डर बंदमुळे परदेशात निर्यात बंद,शेतकरी चिंतातूर

संदीप झिरवाळ
पंचवटी :
 गेल्या काही वर्षभरापुर्वी ५० ते ६० रूपये प्रतिकिलो असा बाजारभाव गाठणाऱ्या टमाटा मालाला नाशिक बाजारसमितीत प्रति २० किलो जाळीला केवळ ४० रूपये (२ रूपये प्रति किलो) असा मातीमोल बाजारभाव मिळत असल्याने नाशिक जिल्हयातील शेकडो टमाटा उत्पादक शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे. गुजरातसह अन्य राज्यात स्थानिक टमाटा माल सुरू झाल्याने तसेच राज्यातील काही जिल्हयातील टमाटा मुंबई व उपनगरात मोठया प्रमाणात विक्र ीसाठी दाखल होत असल्याने बाजारभाव कोसळले असल्याचे व्यापाºयांनी सांगितले. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून टमाटा मालाला २ ते ३ रूपये किलोच्या पुढे बाजारभाव नसल्याने काही टमाटा उत्पादक शेतकºयांनी टमाटा खुडणे बंद करून टमाटयाचे उभे पिक जनावरांसाठी सोडून दिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील काही ठिकाणच्या भागात नाशिकच्या बाजारसमितीतून पाठविल्या जाणाºया टमाटा मालाची निर्यात थांबली आहे. तर गेल्या वर्षभरापासून भारत पाकिस्तान बॉर्डर बंद असल्याने नाशिकच्या बाजारसमितीतून पाकिस्तान, बांग्लादेशात टमाटा माल पाठविणे बंद केले आहे. सध्या गुजरात राज्यातील वापी पर्यंत टमाटा माल जात आहे. याशिवाय मुंबईकडे घोटी, नाशिक, वाडा परिसरातून टमाटा मालाची निर्यात केली जात आहे. व्यापारी वर्गाकडून टमाटा खरेदी केली जात असला तरी टमाटा मालाला उठाव कमी असल्याने टमाटा खरेदी करायला कोणी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. नाशिक बाजारसमितीत काही दिवसांपासून टमाटयाच्या २० किलो जाळीला ४० ते ६० रूपये असा अत्यल्प बाजारभाव मिळत आहे. योग्य बाजारभाव मिळत नाही तसेच लागवड व दळणवळण खर्च निघत नसल्याने टमाटा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. किरकोळ व आठवडे बाजारात १० रूपयात दिड ते दोन किलो दराने ग्राहकांना टमाटा उपलब्ध होत आहे. सध्या टमाटा मालाची आवक आहे तर उठाव नाही. त्यातच अन्य बाजारपेठेतून माल खरेदी करून तो दुसºया बाजारपेठेत रवाना करण्यासाठी मोठा दळणवळण खर्च लागतो. परिणामी व्यापारी देखिल स्थानिक बाजारपेठेतून टमाटा खरेदी करून अन्यत्र पाठवित असल्याने पैशांची व वेळेचीही बचत होत आहे.

Web Title: Tomato 2 kg kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.