तीन पंक्चर चाकांमुळे अर्थव्यवस्थेचा गाडा अडला! - पी. चिदंबरम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 02:43 AM2018-07-08T02:43:18+5:302018-07-08T02:43:20+5:30

गुंतवणूक, निर्यात, विविध उत्पादनांची खरेदी आणि सरकारी खर्च या चार चाकांवर अर्थव्यवस्थेची गाडी धावत असते; परंतु सध्या सरकारी खर्च वगळता अर्थव्यवस्थेची तीन चाके पंक्चर असल्यामुळे अर्थव्यवस्थेचा गाडा अडल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केले.

Three wheelchairs turned the economy of the car! - p. Chidambaram | तीन पंक्चर चाकांमुळे अर्थव्यवस्थेचा गाडा अडला! - पी. चिदंबरम

तीन पंक्चर चाकांमुळे अर्थव्यवस्थेचा गाडा अडला! - पी. चिदंबरम

googlenewsNext

नाशिक - गुंतवणूक, निर्यात, विविध उत्पादनांची खरेदी आणि सरकारी खर्च या चार चाकांवर अर्थव्यवस्थेची गाडी धावत असते; परंतु सध्या सरकारी खर्च वगळता अर्थव्यवस्थेची तीन चाके पंक्चर असल्यामुळे अर्थव्यवस्थेचा गाडा अडल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीतर्फे ‘आर्थिक परिस्थिती : कमी गुंतवणूक, रोजगाराचा अभाव’ या विषयावर शनिवारी येथे चर्चासत्र झाले. चिदंबरम प्रमुख वक्ते होते. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण होते. खासदार कुमार केतकर आणि माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे उपस्थित होते.
नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी) या दोन बाबींनी अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे गुंतवणुकीचा दर कमी झाला आहे तसेच रोजगार निर्मिती पूर्णत: ठप्प झाल्याचेही त्यांनी सांगितले. ही परिस्थिती बदलणे सर्वसामान्यांच्या हातात असल्याचे सांगून त्यासाठी आगामी निवडणुकीमध्ये विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. काळा पैसा बाहेर येण्याची व नोटाबंदीची जी उद्दिष्टे सांगितली गेली ती पूर्ण झाली नाही.

काँग्रेसमुक्तीचा लाभ कोणाला ?
काही साम्राज्यवादी देशांकडून भारताचे विभाजन करण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून होत असल्याचे कुमार केतकर यांनी सांगितले. काश्मीरबाबत सध्याचे धोरण राबविले गेल्यास तेथे अराजक येण्याची व त्यातूनच काश्मीर भारतापासून वेगळा होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. २०१९ च्या निवडणुकांमध्ये कोणाचे काय होणार यापेक्षा देशाचे भवितव्य काय राहणार हा प्रश्न महत्त्वाचा असल्याचेही ते म्हणाले.
स्वातंत्र्याचा संकोच होतोय सध्या देशामध्ये उन्मादक सांस्कृतिक राष्टÑवाद फैलावत आहे. त्यातून न्यायसंस्थेसह विविध संवैधानिक संस्थांच्या स्वातंत्र्याचा संकोच होत असल्याचे अभय ठिपसे यांनी सांगितले. खोट्या इतिहासाचे उदात्तीकरण करून सोशल मीडियाच्या माध्यमातून बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही ते म्हणाले. देशामध्ये अघोषित सेन्सॉरशिप असल्याचे सांगत देशातील सध्याची परिस्थिती चिंताजनक असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Three wheelchairs turned the economy of the car! - p. Chidambaram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.