ढापे अन् पेव्हर ब्लॉकवर चोरट्यांचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 01:13 AM2018-05-15T01:13:01+5:302018-05-15T01:13:01+5:30

कधी महापालिकेने वृक्षांच्या भोवती बसविलेल्या संरक्षित लोखंडी जाळ्या, तर कधी रस्त्यालगत ठेवलेले डस्टबिनचे झाकण चोरी करणाऱ्या चोरट्यांनी आता तर थेट महापालिकेच्या वतीने रस्त्यालगत तयार केलेल्या पदपथावर असलेल्या पेव्हर ब्लॉक अन् गटारांवर बसविलेले ढापे चोरून नेण्याचे धाडस केले आहे.

 Thieves and thieves on the Peaver block | ढापे अन् पेव्हर ब्लॉकवर चोरट्यांचा डल्ला

ढापे अन् पेव्हर ब्लॉकवर चोरट्यांचा डल्ला

Next

पंचवटी : कधी महापालिकेने वृक्षांच्या भोवती बसविलेल्या संरक्षित लोखंडी जाळ्या, तर कधी रस्त्यालगत ठेवलेले डस्टबिनचे झाकण चोरी करणाऱ्या चोरट्यांनी आता तर थेट महापालिकेच्या वतीने रस्त्यालगत तयार केलेल्या पदपथावर असलेल्या पेव्हर ब्लॉक अन् गटारांवर बसविलेले ढापे चोरून नेण्याचे धाडस केले आहे.  दिंडोरीरोडवरील वज्रेश्वरी झोपडपट्टी परिसरातील रस्त्यावरची ही परिस्थिती आहे. परिसरात राहणाºया काही भुरट्या चोरट्यांनी रस्त्यालगत नागरिकांसाठी तयार केलेल्या पदपथावर बसविलेले पेव्हर ब्लॉक चोरून नेले आहेत. या भुरट्या चोरट्यांनी एवढ्यावरच न थांबता पदपथावर बंदिस्त केलेल्या गटारांवरचे संरक्षित ढापेदेखील चोरून नेण्याचे धाडस केले आहे.  गेल्या काही दिवसांपासून भुरटे चोर महापालिकेच्या मालमत्ता चोरी करून प्रशासनाचे नुकसान करीत आहेत. काही वर्षांपूर्वी महापालिकेने दिंडोरीरोडवर वज्रेश्वरी झोपडपट्टी ते आरटीओ कॉर्नरपर्यंत पदपथ तयार केला होता. या पदपथावर पेव्हर ब्लॉक बसविण्यात आलेले होते, परंतु चोरट्यांनी पदपथावरचे पेव्हर ब्लॉक काढून नेले आहेत. परिसरातील झोपडपट्टीत राहणाºया भुरट्या चोरांचे हे कृत्य असल्याचे बोलले जात आहे.  काही दिवसांपासून पंचवटी परिसरातील पेठरोड, आडगाव नाका, फुलेनगर, हिरावाडी परिसरात भुरट्या चोºया वाढल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पेव्हर ब्लॉक नकोच
महापालिकेच्या वतीने रस्त्यालगत तसेच पदपथावर पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम केले जाते. पेव्हर ब्लॉकमुळे परिसर आकर्षित दिसतो म्हणून पेव्हर ब्लॉक बसविले जातात, असे पालिकेच्या वतीने सांगितले जाते. मात्र पेव्हर ब्लॉक बसविले जात असताना ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असतात, शिवाय पेव्हर ब्लॉक बसविणे म्हणजे केवळ संबंधित ठेकेदाराचे आर्थिक पालनपोषण करणे, असा नागरिकांचा आरोप असल्याने रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम नकोच, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Web Title:  Thieves and thieves on the Peaver block

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.