टेनिस स्पर्धेत माहरूख कोकणीला दुहेरी मुकूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 06:44 PM2019-03-29T18:44:02+5:302019-03-29T18:44:23+5:30

नाशिक: जयपूर येथे सुरू असलेल्या आॅल इंडिया टेनिस असोसिएशनच्या ओ.एन.दिक्षित मेमोरियल टेनिस टूर्नामेंट मध्ये येथील माहरूख कोकणी हिने दुहेरी मुकूट मिळविला. ओडिसाच्या शिल्पी दास हिच्यासह दुहेरीत अजिंक्यपद मिळविले.

 In the tennis tournament, Makhrok Konkani doubles crown |  टेनिस स्पर्धेत माहरूख कोकणीला दुहेरी मुकूट

 टेनिस स्पर्धेत माहरूख कोकणीला दुहेरी मुकूट

Next
ठळक मुद्देनाशिक येथे बाबा रॉड्रिग्ज यांच्या मार्गदर्शनाखाली ती पिंटू अस्वले यांच्याबरोबर नियमित सराव करते


नाशिक: जयपूर येथे सुरू असलेल्या आॅल इंडिया टेनिस असोसिएशनच्या ओ.एन.दिक्षित मेमोरियल टेनिस टूर्नामेंट मध्ये येथील माहरूख कोकणी हिने दुहेरी मुकूट मिळविला. ओडिसाच्या शिल्पी दास हिच्यासह दुहेरीत अजिंक्यपद मिळविले.
दुहेरीत तिने अंतिम सामन्यात मुंबईच्या प्रियंका रॉड्रिग्ज व रूपकथा मुखर्जी या जोडीला माहरूख व शिल्पी यांनी नमवून अजिंक्यपद मिळविले. उपांत्य फेरीत या जोडीने हिमाद्री कश्यप व खुशी अग्रवाल यांना हरविले. या स्पर्धेत एकेरीत माहरूख कोकणी हिने अनुराधा सिकदार हिला नमवून अंतिम फेरी गाठली. शुक्रवार दि. २९ रोजी मुंबईच्या प्रियंका राड्रिग्ज बरोबर तिचा अंतिम सामना झाला. यात माहरूखने विजय मिळवून एकेरीतील विजेतेपद मिळविले.
नाशिक येथे बाबा रॉड्रिग्ज यांच्या मार्गदर्शनाखाली ती पिंटू अस्वले यांच्याबरोबर नियमित सराव करते. (२८टेनिस माहरूख )

Web Title:  In the tennis tournament, Makhrok Konkani doubles crown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.