निकालाचे अचूक भाकीत सांगा, २१ लाख जिंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 01:33 AM2019-04-02T01:33:21+5:302019-04-02T01:35:46+5:30

लोकसभा निवडणुकांच्या निकालांची भाकिते वर्तविणाऱ्यांचा सुळसुळाट झाला असताना ज्योतिषांनी निकालाचे अचूक भाकीत वर्तविल्यास २१ लाखांचे बक्षीस देण्याचे महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जाहीर केले आहे.

Tell the exact sequence of the results, 21 million won | निकालाचे अचूक भाकीत सांगा, २१ लाख जिंका

निकालाचे अचूक भाकीत सांगा, २१ लाख जिंका

Next
ठळक मुद्देअंधश्रद्धा निर्मूलन समितीराज्यातील सर्व ज्योतिषांना दिले आव्हान

नाशिक : लोकसभा निवडणुकांच्या निकालांची भाकिते वर्तविणाऱ्यांचा सुळसुळाट झाला असताना ज्योतिषांनी निकालाचे अचूक भाकीत वर्तविल्यास २१ लाखांचे बक्षीस देण्याचे महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जाहीर केले आहे.
आपले भाकीत अचूक ठरत असल्याचा दावा करणाऱ्या ज्योतिष्यांना सतराव्या लोकसभा निवडणुकीचे निकाल तंतोतंत सांगण्याचे आव्हान अंनिसने दिले आहे. समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील म्हणाले की, २०१४च्या लोकसभा निवडणुकीतही अंनिसने सर्व नामवंत ज्योतिषांना तसे कळविले होते. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही.
आमच्या आव्हानाची मुदत संपल्यानंतर ते वादविवाद करतात. ज्योतिषांचं नाणं जर खणखणीत असेल, तर त्यांनी आमचे आव्हान स्वीकारावे आणि २१ लाख
रुपयांचे बक्षीस मिळवावे, असेही पाटील म्हणाले.
उमेदवार ज्योतिषांच्या चरणी
अनेक उमेदवार भविष्य जाणून घेण्यासाठी ज्योतिषांना हजारो रुपये देतात. आयुष्याचे महत्त्वाचे निर्णय घेताना ही मंडळी ज्योतिषाच्या चरणी जातात. त्यामुळे ज्योतिषांनी आमच्या २५ पैकी किमान २२ प्रश्नांची तरी योग्य व खरी ठरणारी उत्तरे द्यावीत, असे आव्हानही पाटील यांनी दिले.

Web Title: Tell the exact sequence of the results, 21 million won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.