शिक्षकांची दिवाळी अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 05:48 PM2018-11-07T17:48:59+5:302018-11-07T17:49:14+5:30

दाभाडी : तालुक्यातील १२१ शिक्षकांचे अग्रीम व आॅक्टोबरचे वेतन महाराष्टÑ बँक शाखेच्या खात्यावर जमा न झाल्याने शिक्षकांची दिवाळी अंधारात जात आहे.

Teacher's Diwali in the dark | शिक्षकांची दिवाळी अंधारात

शिक्षकांची दिवाळी अंधारात

googlenewsNext

दाभाडी : तालुक्यातील १२१ शिक्षकांचे अग्रीम व आॅक्टोबरचे वेतन महाराष्टÑ बँक शाखेच्या खात्यावर जमा न झाल्याने शिक्षकांची दिवाळी अंधारात जात आहे. शिक्षण विभागाच्या निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती शिक्षकांवर ओढावल्याने या प्रकाराच्या निषेधार्थ येथील पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर सर्व संघटना कृती समितीने काळा आकाश कंदिल लावून निषेध व्यक्त केला आहे.
दिवाळी सणापूर्वी शिक्षकांचे वेतन खात्यावर जमा होणे अपेक्षित होते; मात्र पंचायत समिती शिक्षण विभाग व महाराष्टÑ बँकेच्या भोंगळ कारभारामुळे तालुक्यातील शिक्षकांची दिवाळी साजरी झाली नाही. प्रशासनाचा निष्काळजीपणा यास कारणीभूत असल्याने सर्व शिक्षक संघटना कृती समितीने पंचायत समिती प्रवेश्द्वारावर काळ्या आकाश् कंदील लावून निषेध नोंदविला. तसेच पंचायत समितीला सुट्टी, अधिकारी उपलब्ध नसल्याने भिंतीला निवेदन चिटवण्यात आले. या आंदोलनात शिक्षक संघटनेचे सुभाष वाघ, भाऊसाहेब पवार, शरद ठाकूर, सुनील ठाकरे, तालुका सरचिटणीस भाऊसाहेब सोनवणे, सुधाकर पवार, विजय पिंगळे, जिल्हा पदाधिकारी अनिल जगताप, कैलास पगार, किशोर सोंजे, विजय अहिरे, भरत शेलार, रमेश चव्हाण, वाल्मिक घरटे, विष्णू गुमाडे, पी. के. बच्छाव आदिंसह पदाधिकारी व शिक्षक सहभागी झाले होते.

Web Title: Teacher's Diwali in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक