तारवालानगरमध्ये एकावर धारदार शस्त्राने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 01:31 AM2018-12-15T01:31:56+5:302018-12-15T01:32:10+5:30

किरकोळ कारणावरून कुरापत काढून दोघा संशयितांनी एकावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना गुरुवारी (दि.१३) रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास दिंडोरीरोडवरील तारवालानगर परिसरात घडली़

In the Tarawalnagar, a sharp weapon with a sharp weapon | तारवालानगरमध्ये एकावर धारदार शस्त्राने वार

तारवालानगरमध्ये एकावर धारदार शस्त्राने वार

Next

पंचवटी : किरकोळ कारणावरून कुरापत काढून दोघा संशयितांनी एकावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना गुरुवारी (दि.१३) रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास दिंडोरीरोडवरील तारवालानगर परिसरात घडली़ नीलेश प्रकाश बोरसे असे गंभीर जखमी झालेल्या इसमाचे नाव असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तलाठी कॉलनीतील रहिवासी नीलेश बोरसे हे गुरुवारी रात्री परिसरातील शेकोटी भोवती बसलेले होते़ यावेळी संशयित मारुती गायकवाड व त्याचा साथीदार अक्षय जाधव यांनी चारचाकी (एमएच १५, डी ५४२२) जवळून नेली व पुन्हा माघारी आले़ यावेळी शेकोटी भोवती बसलेल्या निलेश बोरसे यांनी गाडी इतक्या जवळून का नेली याची विचारणा केली असता संशयितांना राग आल्याने त्यांनी बोरसे याच्यावर धारदार शस्त्राने वार करून जखमी केले.
दरम्यान, याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे़

Web Title: In the Tarawalnagar, a sharp weapon with a sharp weapon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.