हिरावाडी जॉगिंग ट्रॅकचा भटक्या श्वानांकडून ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 12:15 AM2019-05-04T00:15:23+5:302019-05-04T00:16:46+5:30

स्वर्गीय मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल लगत मनपा प्रशासनाने नागरिकांसाठी तयार केलेल्या जॉगिंग ट्रॅकवर गेल्या काही दिवसांपासून मोकाट श्वानांचा उपद्रव वाढल्याने सकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेने या मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जॉगर्सने केली आहे.

Take control of the Hirawadi jogging track from wandering dogs | हिरावाडी जॉगिंग ट्रॅकचा भटक्या श्वानांकडून ताबा

हिरावाडी जॉगिंग ट्रॅकचा भटक्या श्वानांकडून ताबा

googlenewsNext
ठळक मुद्देफिरणे मुश्किल : अंगावर धावून जाण्याचे प्रकार

पंचवटी : स्वर्गीय मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल लगत मनपा प्रशासनाने नागरिकांसाठी तयार केलेल्या जॉगिंग ट्रॅकवर गेल्या काही दिवसांपासून मोकाट श्वानांचा उपद्रव वाढल्याने सकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेने या मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जॉगर्सने केली आहे.
हिरावाडीत पाण्याच्या पाटाला लागून महापालिकेने तयार केलेल्या जॉगिंग ट्रॅकवर सकाळच्या सुमारास युवक, नागरिक तसेच ज्येष्ठ नागरिक फिरण्यासाठी येत असतात. याच ट्रॅकवर पंधरा ते वीस मोकाट श्वान बसलेले असतात. सकाळी नागरिक ट्रॅकवर येत असले तरी या ठिकाणी विद्युत व्यवस्था नसल्याने नागरिकांना अंधारात मार्गक्रमण करावे लागते. ट्रॅकवर बसलेले श्वान फिरणाºया नागरिकांच्या अंगावर धावून जात असल्याने या श्वानांची नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. दिवसभर ट्रॅकचा ताबा घेतलेले हे मोकाट श्वान ट्रॅकची माती उखडून खड्डे करत असल्याने या खड्ड्यात तोल जाऊन नागरिकांच्या पायाला दुखापत होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. मोकाट श्वानांमुळे नागरिकांना सकाळी स्वसंरक्षणार्थ फिरताना हातात दगड किंवा काठ्या घेऊन ये-जा करावी लागत असल्याचे चित्र दिसून येते. लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या अद्ययावत ट्रॅकवर गेल्या काही दिवसांपासून मोकाट श्वानांनी ताबा घेतल्याने महापालिका प्रशासनातर्फे वेळीच श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ट्रॅकवर फिरण्यासाठी येणाºया नागरिकांनी केली आहे.
पाळीव श्वानांचाही त्रास
नागरिकांसाठी तयार केलेल्या जॉगिंग ट्रॅकवर सकाळच्या सुमाराला काही महिला, नागरिक पाळीव श्वान फिरवण्यासाठी घेऊन येतात. हे पाळीव श्वान ट्रॅकवर लघुशंका तसेच प्रातर्विधी करत असल्याने जॉगिंग ट्रॅक नागरिकांना फिरण्यासाठी की पाळीव श्वानांसाठी, असा सवाल नागरिक करीत आहे. जॉगिंग ट्रॅकवर पाळीव श्वान घेऊन फिरणाºया नागरिकांवर मनपाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Take control of the Hirawadi jogging track from wandering dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.