पिनाकेश्वर देवस्थान सुविधांसाठी सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 06:52 PM2018-09-20T18:52:11+5:302018-09-20T18:52:28+5:30

नांदगाव तालुका : बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

 Survey for Pinakeshwar Devasthan Facilities | पिनाकेश्वर देवस्थान सुविधांसाठी सर्वेक्षण

पिनाकेश्वर देवस्थान सुविधांसाठी सर्वेक्षण

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री आणि वनमंत्री यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा झाल्यानंतर सदर देवस्थान ड वर्ग वन पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याची परवानगी देण्यात आली

नांदगाव : तालुक्यातील जातेगावपासून उत्तरेस असलेल्या सह्याद्री पर्वत रांगेतील डोंगरावर असलेल्या पुरातन श्री पिनाकेश्वर देवस्थानास वन पर्यटन स्थळ म्हणून मंजुरी मिळाल्याने त्याअनुषंगाने परिसरात विविध सोयीसुविधा पुरविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागासह वनविभागाच्या अधिका-यांनी भेट देऊन सर्वेक्षण केले.
सहवनसंरक्षक आर. ए. कापसे, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, वनरक्षक राजेंद्र दौंड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यशवंत पाटील, कनिष्ठ अभियंता डी. ए. धारक, स्थापत्य अभियंता एम. पी. निकम यांनी रस्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मंदिर परिसर सुशोभिकरण, सभामंडप दुरु स्ती, उद्यान, निवारा शेड, भंडारगृह, स्वच्छतागृह, व्यापारी संकुल उभारणे, वाहनतळ आदी कामांची सुरु वात करण्याअगोदर परिसराची पाहणी केली. यावेळी देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता, उपसरपंच नारायण पवार, वन समिती अध्यक्ष संतोष डांगे, माजी सरपंच विजय पाटील, राजेंद्र लाठे, कैलास तुपे, पंढरीनाथ भगत, दारासिंग बिडे, शिवाजी गायकवाड, अंकुश वर्पे, नानासाहेब पवार, यमराज वाघ, विष्णू जाधव, बाळासाहेब जाधव उपस्थित होते. देवस्थानाचा वन पर्यटन विभागाकडून विकास करण्यात यावा यासाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांनी सन २०१६-१७ मध्ये विधानसभेत मागणी केली होती. या देवस्थानच्या ठिकाणी जाण्यासाठी वन विभागाच्या हद्दीतून जावे लागत असल्याने, रस्ता व इतर विकासकामांना वन विभागाची परवानगी आवश्यक असते. सदरची परवानगी तातडीने मिळावी यासाठी आमदार पंकज भुजबळ यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली होती. मुख्यमंत्री आणि वनमंत्री यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा झाल्यानंतर सदर देवस्थान ड वर्ग वन पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याची परवानगी देण्यात आली होती.

Web Title:  Survey for Pinakeshwar Devasthan Facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक